बेडूक...




डबक्याच्या बाहेर पडलं

तेव्हा बेडूक समुद्रात उतरलं,

त्याच्या अडचणी च्या कक्षा रुंदावत गेल्या,

तिथं त्याला भरपूर संधी भेटल्या ,

अन्नाचा प्रश्न तर कसाबसा मिटला,

पण अस्तित्वाचा मोठा प्रश्न उठला,

चहुकडं धोके आणि धोक्याच्या सूचना त्यानं बघितल्या,

हुशार बेडकानं त्या खूपच मनावर घेतल्या,

बाकीचे त्याचे मित्र घाबरून परत डबक्यात गेले,

धडपडीच्या या दुनियेस ते लवकर भिले,

पण हा मात्र आपलं काम करत राहिला,

कारण यानं कामात आनंद पाहिला,

बाहेर च्या जगाशी त्याचा संवाद आला,

तेव्हा हा बेडूक त्यांच्यामधलाच एक झाला...




गणेश शेळके

(१७/०६/२०१८)

Comments

Popular posts from this blog

लग्न म्हणजे... (भाग १)

कठीण परिस्थिती

बड़ी अच्छी है तनहाई...!