ग्रंथ हेचि गुरू...






एक दिवस सहज बाहेर गेलो होतो.एका ठिकाणी पुस्तकांचं भव्य प्रदर्शन भरलेलं दिसलं.मी आत गेलो अन खूप सारे पुस्तकं चाळून बघितली.तिथल्या पुस्तकांपैकी एक जरी वाचलं तर आयुष्याचे महत्वाचे धडे शिकायला भेटू शकतात. 'द पॉवर ऑफ हॅप्पी थॉट्स' नावाचं पुस्तक मी तीन वर्षांपूर्वी थोडंच वाचू शकलो होतो पण त्याचा माझ्यावर इतका परिणाम झाला की माझे परिस्थितीकडे बघण्याचे विचार अन दृष्टिकोनच बदलून गेलेत..ग्रंथ हेच आपल्याला आपल्या अडचणींवर उपाय शोधण्यात मदत करू शकतात.निर्जीव पेजेस ची ही पुस्तकं ,पूर्ण इतिहास अन जगाला आपल्या समोर सजीव बनून व्यक्त करत असतात.. आज तुम्हाला कोणी मार्गदर्शक जर भेटत नसेल तर रिकामे फिरण्यात वेळ घालवण्यापेक्षा चांगले चांगले ग्रंथ वाचण्यात वेळ घालावा.ज्ञानात भर पडली की अडचणी आपोआप कमी होतात.असे खूप विषय आहेत ज्याबद्दल कुणाला काहीच माहीत नसतं पण हे पुस्तकं तेपण आपल्याला वाचण्यासाठी उपलब्ध करून देतात. लिहिणाऱ्या प्रत्येक माणसानं आतापर्यंत अनेक जग बदलून टाकणारी कितीतरी ग्रंथ, पुस्तकं,कादंबऱ्या असे खूप सारे साहित्य लिहून ठेवले आहेत.खरच किती प्रगल्भ विचारवंत आहेत आपल्या देशात ज्यांनी आपल्या जीवनात घडलेल्या चांगल्या वाईट अनुभवांचा जिवंत खजिना उपलब्ध करून दिलेला आहे. खरंच सांगतो ,मी आजपर्यंत फक्त असे पंधरा सोळा बारीक चिरीक पुस्तकं वाचलेली आहेत.वाचनाची आवड फार आहे पण वेळ भेटत नाहीये जास्त.पण जेव्हा वेळ असेल तेव्हा वाचण्यासाठी मी नक्कीच खूप सारे पुस्तकं आणून ठेवीन जे मला मार्गदर्शन करतील..


             Gk...

Comments

Popular posts from this blog

लग्न म्हणजे... (भाग १)

कठीण परिस्थिती

बड़ी अच्छी है तनहाई...!