साऱ्याच मनांना हक्क आहे...
साऱ्याच मनांना जन्मसिद्ध
हक्क आहे हसण्याचा.
आयुष्यातला आनंद
मनापासून भोगण्याचा..
कितीही जन्म गेले
तरी भाग्य लागते
माणसाचा जन्म भेटण्याचा !
हक्क आहे ,हक्क आहे सर्वांना
आपला विषय मांडण्याचा,
प्रत्येक शब्दाला हक्क आहे
कृतीमध्ये उतरण्याचा !
भलं असो ,बुरं असो
वा गोंधळ असो मनातला,
यांच्याचसाठी कुढत असतो
जीव हा माणसाचा !
निराशा कशा या येई वाटेत,
कितीही असो रस्त्यात काटे,
अर्थ त्यातूनच कळतो
दुर्मिळ या जगण्याचा !
सुख असो वा असो हे दुःख
ते पचवण्या लागतो साऱ्याना
निर्धार असा तो मनाचा !
नको तो गर्व , नको तो हेवा
नको ती भ्रांती अहंपणाची
नसावा कुणातही मीपणा अन
अंश मात्रही स्वार्थाचा !.....
कवी -: गणेश शेळके
Comments
Post a Comment