अस्तित्व माझे...
अस्तित्व माझे....
काय आहे अस्तित्व माझे ?... प्रश्न हा मला रोज पडतोय,
हीरा आहे की कोळसा लपलेला माझ्यात मी शोधतोय...
हरवलोय मी कुठंतरी एका कोपऱ्यात शहराच्या,
मुंगी पेक्षाही लहान आपण तुलनेत जगाच्या,
स्वतःमध्येच कुठतरि एक विचित्रपणा बघतोय...
काय आहे मी ,कसा आहे मी ?
याचेच कोडे पडे मला नेहमी...!
हलकेच मिटवुनि डोळे ,
मी माझ्यातला खरा "मी "शोधतोय...
:@Gkshelke...
Comments
Post a Comment