सांगा बरं...

दिवाळी म्हणजे 'फटाके आणि मोठया आवाजाने वाटणारी गंमत....' असा विचार मुलांमध्ये असतो..खरच सांगा मित्रहो, फटाके फोडून कोणता फायदा होतो बरं...? होणाऱ्या आवाजानं धीट पोरं आनंद घेतात पण तिथच्या आजूबाजूच्या म्हाताऱ्या कोताऱ्या अन चिमुकल्या मंडळींचा विचार करतं कोणी?.... दिवाळी आली रे आली की पोरं एका हप्त्या आधीच फटाके फोडायला सुरू होतात न!...पण या लहान मुलांना फटाक्यापासून होणाऱ्या वाईट परिणामाचं ज्ञान देतं कोणी? ....बरं तुम्हाला फोडायचेच असतील तर कमी आवाजाचे आणि कमी घातक फटाके फोडा की ....ते सुतळी बॉम्ब , तीन आवाजाचे फटाके, ते रॉकेट अन अजून निघतच आहेत नवीन नवीन विस्फोटक आवाजाचे फटाके....! 


    बरं फक्त दिवाळीचंच असतं तर काही वाटलं नसतं. इथं तर नवीन वर्षांचं स्वागतही  फटाक्यांशिवाय होतंच नाही....आणि जेव्हा लग्नाचा सिजन असतो तेव्हा विचारूच नका बापाहो !...."अमक्याच्या पोरीच्या लग्नात अमुक हजाराचे नुसते फटाके होते ,आता आमच्या पोरीच्या लग्नात टमुक हजाराचे फटाके आणू !"आम्हीच आमच्या पर्यावरणाचा ऱ्हास करायला निघालोय....लहान बाळांच्या कानासाठी ते मोठे आवाज किती घातक असतात माहीत आहे ? वयोवृद्ध लोकांना किती त्रास होतो त्याचा माहीत आहे? दरवर्षी कितीतरी लहान मुलं फटाके फोडण्याच्या नादात मेलीत माहीत आहे?...काय केलं मग तुम्ही हे सगळं माहीत असूनही ?....भारतानं वर्ल्ड कप जिंकला तर फटाके फोडूनच आनंद व्यक्त होणार असं आहे का ?....ते तर जाऊ द्या हो ,पण जेव्हा आमचे माणसं निवडणुका जिंकून येतात तेव्हा .....फटाक्यांनीच त्यांचं अभिनंदन करायचं ही आमची महान परंपरा....दिवाळी सारख्या शुभ  स्मृतीच्या सणाला  असे हानिकारक पदार्थांच्या मिश्रणापासून बनलेल्या फटाक्यांच्या फोडल्यानं आपण कसं काय साजरं करू शकतो हे कळत नाही मला.... कोणाचा फटाका मोठा आवाज काढतो असं फालतूपणाचं कुतूहल वाटते आम्हाला....आणि तिकडं कुणाला त्याचा काही त्रास होतोय याचं काहीच वाटत नाही ?....

तुळशीचं लग्न ,फोड फटाके! नवीन वर्ष , फोड फटाके!
 निवडणुकीत जिंकले, फोड फटाके !कुणाची जयंती असली ,फोड फटाके!...दुसरं काही भेटत नाही का फोडायला ज्यानं आपल्या पर्यावरणाचं, आपल्या वृध्द आजी आजोबांचं, आपल्या चिमुकल्या मित्राचं नुकसान होणार नाही असं काहीतरी.....? सुशिक्षित मंडळींनी ही गोष्ट सर्वात आधी विचारात घेतली पाहीजे आणि निदान आपल्या मुलांना आणि कुटुंबियांना समजावून सांगितली पाहिजे...आजच्या पिढीला शहाणं बनवाल तरच पुढं तेही या चांगल्या विचाराना कृतीत आणू लागतील..तुम्हाला तर माहीतच आहे का, फटाके फुटल्यावर घातक रसायने बाहेर निघतात जे हवेत मिसळून हवा घातक वायूंनी भरते आणू त्याचा परिणाम आपल्या श्वसन संस्थेवर होऊ शकतो...काही फटाक्यांचा आवाज खूप मोठा असतो जो प्रौढ व्यक्तीच्या कानाला तर घातक आहेच  पण लहान मुलांच्या कोवळ्या शरीरालाही त्याचा घातक परिणाम सोसावा लागू शकतो याचं भान आपण ठेवलं पाहिजे...अस्तमाच्या पेशंट ला त्या धुरापासून खूप त्रास होतो..एका गल्लीत, एका गावात ,एका शहरात आणि अशा अनेक ठिकाणी फोडले जाणारे ना ना प्रकारचे फटाके किती परिणाम करत असतील तुम्हीच विचार करा... 
  मित्रांनो तुम्ही स्वतः च्या क्षणभराच्या आनंदासाठी दुसऱ्याला त्रास देऊ इच्छिता का ? तुम्हाला तुमच्या पर्यावरणाच्या संरक्षणाशी काही देणं घेणं नाहीय का? मोठया आवाजाच्या फटाक्यावजी तुम्ही साधे फटाके फोडू शकत नाही का? ....जेव्हापासून कळायला लागलंय तेव्हापासून मी फटाके फोडणंच बंद केलंय...फटाके ऐवजी आणखी काही करता येईल का याचा शोध घ्यायला पाहिजे जेणेकरून दिवाळीचा आनंदही कमी होणार नाही.. मित्रांनो नक्कीच विचार कराल   मित्रांनो तुम्ही स्वतः च्या क्षणभराच्या आनंदासाठी दुसऱ्याला त्रास देऊ इच्छिता का?

        Ganesh Shelke

Comments

Popular posts from this blog

लग्न म्हणजे... (भाग १)

कठीण परिस्थिती

बड़ी अच्छी है तनहाई...!