Posts

Showing posts from March, 2020

पालक_आणि_बालक

Image
       आज जी बालक आहेत,        ते उद्या पालक बनतील,        आपल्या चुकांबद्दल मुलांना          शिकवण देऊ करतील.         पण स्वतः सुधारल्या विना         मुलं समजून घेणार नाहीत,          उद्या आपल्या चुकांसाठी         ताणें मारल्या विना राहणार नाहीत...         आजचा पालक जर शिव्या देत असेल,          तर मुलांकडून चांगलं वागण्याची                     अपेक्षा का ठेवायची?        त्यांना संस्कार देण्यासाठी         पहिली आपली भांडणं निपटायची.        कारण ही दुनिया आहे डुप्लिकेशन ची,           आपली लहान पोरं करतील कॉपी ,               आपल्या आजच्या सर्व ऍक्षण ची...           भ...

#खूप काही करावसं वाटतं...

Image
कधी कधी जीवन खूप काही शिकवतं. मनात जे येईल तर करायला जमत नाही.  खूप साऱ्या जबाबदार गोष्टी असतात ज्या माणसाला नीट जगुपण देत नाहीत.. शिक्षण संपत नसतं. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर माणूस काही न काही शिकत असतो. त्याला परिस्थिती शिकवत असते. त्याच्या प्रत्येक कामाचा त्याच्या भविष्यावर प्रभाव दिसून येत असतो. त्याची पुढची जबाबदारी म्हणजे पुढील पिढीसुद्धा त्याच्या कर्माचे भोग कुठं न  कुठं भोगत असतात. ग.का.शेळके 9503749967
माणूस कितीही शिकला तरी या हल्लीच्या जगात त्याच्या मनासारखं काम भेटणं थोडं अवघडच असतं.. घरच्यांना काय, "खूप शिकला ,आता लाग कुठंतरी कामाला.."  म्हणायला जास्त कष्ट पडत नाहीत, पण ज्याचं त्यालाच कळत असतं...आज इतके शिक्षण घेऊनही अनेक तरुण जॉब साठी वणवण फिरतांना दिसतात. प्रत्येक जण आर्मी मध्ये किंवा पोलीस मध्ये लागेलच असं थोडी आहे!... इथं प्रश्न निगेटिव्ह किंवा पोजिटिव्ह विचार ठेवण्याचा नाहीय,तर वास्तविक स्थिति शी परिचय करून घेण्याचा आहे.. ग.का.शेळके