लग्न म्हणजे... (भाग १)
*लग्न म्हणजे.....(भाग १)* लग्न माझ्यासाठी खूप म्हणजे खूपच मोठी गोष्ट आहे. अजून लगीन झालं नाही तरी मला आजूबाजूच्या जोडप्यांचे संसार बघू बघू खूप अनुभव आले आहेत. ते म्हणतात ना काही गोष्टी करून बघितल्या पेक्षा दुरून बघितल्यावर सुद्धा माणूस शिकत असतो. लग्न म्हणजे फक्त बायको आणि मुलं असणं आणि मोठा संसार असा अर्थ नसतो. तर नवरा बायको ने एकमेकांच्या प्रत्येक गोष्टी आणि सवयीबद्दल जागरूक राहून प्रत्येक चांगल्या वाईट परिस्थितीत एकमेकांना समजून घेऊन सांभाळायचं असतं... मला माझे मित्र , मैत्रिणी आणि नातेवाईक तसेच सहकारी नेहमी विचारतात की *लग्न कधी करतो?* माझं एकच उत्तर असते की मी सध्या स्वतः ला लग्नाच्या लायकीचा समजत नाही. कारण लग्न काही पोरखेळ नाहीय! *फक्त एक चांगल्या मनाचा माणूस* म्हणून मी कोणासाठी योग्य ठरत नाही. सोबतच आर्थिक सुरक्षिततेचा प्रश्नही महत्वाचा असतो, (जो सुटायला अजून काही दिवस बाकी आहेत). माझ्या मते *लग्न ,बायको , पोरं बाळं* ही माणसाची *गरज नसते*. तर आयुष्य अजून सुंदरतेने जगण्यासाठी असलेल्या माध्यमांपैकी एक असते. *लग्न केलं तर मुलं बाळं केलीच पाहिजे* अशीही गरज नसते . ...
Comments
Post a Comment