पालक_आणि_बालक
आज जी बालक आहेत,
ते उद्या पालक बनतील,
आपल्या चुकांबद्दल मुलांना
शिकवण देऊ करतील.
पण स्वतः सुधारल्या विना
मुलं समजून घेणार नाहीत,
उद्या आपल्या चुकांसाठी
ताणें मारल्या विना राहणार नाहीत...
आजचा पालक जर शिव्या देत असेल,
तर मुलांकडून चांगलं वागण्याची
अपेक्षा का ठेवायची?
त्यांना संस्कार देण्यासाठी
पहिली आपली भांडणं निपटायची.
कारण ही दुनिया आहे डुप्लिकेशन ची,
आपली लहान पोरं करतील कॉपी ,
आपल्या आजच्या सर्व ऍक्षण ची...
भांडणं तुमची कोणतीही,
करायची नसतात मुलांसमोर,
कारण नक्कल तेही करतात आपली,
त्यांचाही संसार सुरू झाल्यावर...
शक्य तितके शांत ठेवावे
आपल्या घरचे मानसिक वातावरण,
कारण त्याच्या प्रभावानेच मुले
भांडू शकतात विनाकारण...
'पालक भी कभी बालक था'
या तत्वावर धावत चला,
पोरांसमोर जबाबदारीने वागत चला..
कोवळ्या वयातच घडतात संस्कार,
म्हणून सवयी चांगल्या ठेवत चला...
ग.का.शेळके
(बुलढाणा जिल्हा)
९५०३७४९९६७
Comments
Post a Comment