वास्तव आहे

 खात खात धक्के ती,

म्हातारपणात आली होती,

कमावलेल्या इस्टेटीची,

झोळी रिकामी झाली होती,

जीव तिचा एकटा दुकटा,

धाकामध्ये आला होता,

कारण तिचा म्हातारा तिला 

अचानक सोडून गेला होता...

काळ तिचा सुद्धा येणार,

हे तिला ठाऊक होतं,

इस्टेटीची वाटप केल्याशिवाय,

जीव तिचा सुटणार नव्हता...

सक्के पोरं - सुना मारत होते ताणें,

एकट्या जिवाने कुठं सांगावं गाऱ्हाणे...

श्रावण बाळ योजनेसाठी म्हातारी 

आफिसांत फिरत होती,

करून द्या हो लवकर काम,

वारंवार विनवत होती.

तरुणपण ते तरुणपण ,

म्हातारपण लय अवघड असतं,

चिडचिडेपणा अन हेवा देवा,

यांचं सगळं मिश्रण असतं...

आयुष्य सरते मुलांसाठी,

स्वतः साठी काही उरत नाही,

म्हाताऱ्यांना काही काही,

जगण्यातला आनंद मिळत नाही...

घाऊक इच्छा किरकोळ जखमा घेऊन,

म्हातारपण ते सरत असतं,

अन प्रत्येक गल्लीत एक म्हातारी

अन एक म्हातारं झुरत असतं..


     G.K.SHELKE

 10.01.2021

Comments

Popular posts from this blog

लग्न म्हणजे... (भाग १)

कठीण परिस्थिती

बड़ी अच्छी है तनहाई...!