लग्नाबद्दल..
काही गोष्टीचं मला कधीकधी खूप हसू येतं.
जसं की लग्न! आय मिन ,लग्न करणं म्हणजे आजकाल फॅशन च झाली आहे असं वाटत नाही का? म्हणजे घरच्यांना वाटू लागते की मुलाचं वय झालंय तर लग्न लावून टाकू म्हणजे घरी स्वयंपाकात मदत करायला आणखी दोन हात मिळतात... आणखी मुलाला जबाबदार जर बनवायचं असेल तर त्याचं लग्न लावून टाकायचं ही तर प्रथाच बनवलीय लोकांनी! प्रत्येक मुलगा त्या मापात कसा काय बसू शकतो? सोयरिकी पण अशा अशा जमतात की काय सांगावं! लग्न करूच नका असं थोडी म्हणतो मी? पण लग्नाच्या लायकीचे आहात का याचं परीक्षण कोण करते? लग्न म्हणजे गंमत करून ठेवली आहे लोकांनी! आणि त्याहूनही मोठी गंमत म्हणजे मागे पुढं काही न बघता लग्नाच्या एका वर्षातच मुल जन्मास घालणं! मग त्यासाठी आपण जबाबदार आहोत का, ती मुलगी शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या तयार आहे का, या गोष्टींचा किती जण विचार करतात? लोकांच्या घरी पाळणा हलतो, लगेच इकडं ह्यांचं मन हलू लागतं! कधी कधी मनात विचार येतो की हे लग्न करणं कंपल्सरी असते का? ... ज्यांचं खरंच आर्थिक ,मानसिक तसेच कौटुंबिक बाबतीत व्यवस्थित असेल त्यांनीच लग्नाचा विचार केलेला बरा, असं मला वाटतं.
Comments
Post a Comment