माझ्या भाषेत देव कसा आणि कोण?
मी दैवापेक्षा माझ्या निर्णयांवर जास्त विश्वास ठेवतो. वास्तव परिस्थिती चा अभ्यास करून च मी माझं प्रत्येक पाऊल ठेवत असतो.माझ्या स्टेटस ला तुम्हाला जास्त कोण्या महापुरुषांच्या जयंती निमित्त किंवा देवाधर्मानिमित्त फोटो व्हिडीओ दिसणार नाहीत. कारण माझ्यासाठी माझं कर्म आणि मी करत असलेले लोकांच्या भल्या साठीचे सातत्याचे प्रयत्न हेच देवस्वरूप आहेत.देवाने शरीर दिलं त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी करणं हेच आपल्या धर्मांनि आणि महापुरुषांनी शिकवलं.पण हल्ली त्यांच्या विचारा ऐवजी नुसता त्यांचे भक्त असल्याचा देखावा मिरवला जातो ...देव आपल्या समोर संधी मांडतो मान्य आहे, पण त्या संधीचं काय करायचं, ती स्वीकारायची की नाकारायची हे निर्णय आपण घेतो म्हणून आपलं यशापयश ठरत असतं..वास्तवात देव ही एक अमूर्त संकल्पना आहे जिला काही स्वार्थी लोकांनी 8 हात देऊन, 10 तोंड देऊन अर्थाचा अनर्थ करून टाकला!... माझ्यामते जे काही चांगलं असेल ते देव आहे आणि जे वाईट असेल ते राक्षस ...देव प्रत्येक ठिकाणी असतो.हवा,अन्न,पाणी,माती,आग,दगड धोंडे,वनस्पती असा मिळून जो खरा देव तयार होतो त्याचं नाव आहे "निसर्ग"....
निसर्ग हाच खरा देव आहे!मानवाला जन्मास घालून देवाने त्याचं काम केलं असं मला वाटतं...! आता त्याने बनवलेल्या या विश्वाला त्याचे हे मुलं कशा पद्धतीने वागवतात, तिचे कसे पोषण करतात हे सगळं देव वरून म्हणा,स्वर्गातून म्हणा किंवा सर्व तीर्थांमधून म्हणा बघत असावा असं मला राहून राहून फील होत आहे..!😳महापुरुषांनी लोकांना कर्मवादी बना , स्वतः चे विचार अंगी बाळगा, दुसऱ्यांच्या भल्याचं चिंता,स्व मेहनतीवर विश्वास ठेवा,स्वतः चे निर्णय योग्यपणे घ्या, असं लय काही शिकवण्याचा लय प्रयत्न केला...पण त्याचा उलटा परिणाम म्हणून आज त्यांच्याच मंदिरे, पुतळे, मुर्त्या चौकावर तसेच गल्लोगल्ली लावून तिथंच जास्त सणवार च्या सुट्ट्या अन तिथंच पूजा पाठात टाईम घालून महापुरुषांच्या विचारांना फोडणी घातली जात आहे...लय बेक्कार स्थिती आहे.लोकं स्वतः च्या प्रयत्नांवर विश्वास न ठेवता देवाचा धावा करताना जास्त दिसताहेत...!मी नास्तिक मुळीच नाही बरं का भो!😉
फक्त मी देवाला माझ्या चांगल्या कामामधून नमस्कार करणं पसंद करतो इतकंच..! अवघडलेल्या ,दुरबळ, कमजोर,गरीब,अनाथ, असहायय लोकांना 5 रु ची जरी मदत होत असेल तर तिथंच तुम्ही देवाला खरा नमस्कार घालता असं मला वाटतं... देव तुमचे कर्म पाहतो,देवाला कशाचीच कमी नाही तेव्हा आपण कोण त्याला दान धर्म करणारे? माझ्या स्वप्नात एक वेगळा समाज मी बघून ठेवला आहे. बघू तो प्रत्यक्षात येतो की नाही तर...🤗🤔
लेखक - G.K.SHELKE
(लय दिवस झाले नुसतं आय टी कंपनी बद्दल लिहत होतो ,म्हणून एक वेगळं लेखन सुरू करत आहे आजपासून)
Comments
Post a Comment