सक्सेस,माझं लग्न आणि माझी लाईफ पार्टनर......😃🙏🏽
माणूस त्याच्या आयुष्याला स्वतःच प्रयत्नांनी घडवत असतो हे तर सर्वांनाच माहीत असेल.असाच निर्णय मी नोव्हेंबर 2020मध्ये घेतला आणि जगातील सर्वात मोठ्या आंतराष्ट्रीय लेव्हल वर लॉन्च होत असलेल्या टोटल इंटरनेट सोल्युशन देणाऱ्या आय टी कंपनी चा एक जबाबदार संस्थापक सदस्य बनलो.🤗 हा झाला माझ्या येणाऱ्या सक्सेसफुल लाईफ चा पाया. आता ह्याच भक्कम पायावर माझी पुढची सर्व स्वप्न आणि इच्छा अवलंबून आहेत .सरळ आणि सोपी गोष्ट आहे की ज्या व्यक्ती कडे अशी मोठी पोजिशन असेल आणि त्याला त्याबद्दल सगळं समजून सक्सेस होणारच हे अनेक अनुभवांतून कळलं असेल तर त्याच्या लग्नाचा इश्यू च राहणार नाही.एका मुलीच्या आईवडिलांना त्यांच्या होणाऱ्या जावयामध्ये काय हवं असतं? तो हुशार असो व नसो पण त्याला कुठलंही व्यसन नसावं. त्याच्या घरी जमीन जुमला असो व नसो, पण स्वतः चं कर्तृत्व आणि जबाबदार व्यक्तिमत्त्व त्याच्याकडे असावं.त्याच्या घरी त्याची इज्जत केली गेली पाहिजे जेणेकरून त्यांच्या मुलीला सुद्धा तेवढी इज्जत भेटेल.त्यांच्या मुलीला नेहमी समजून घेणारा व्यक्ती असावा. तिला जर पुढं शिकायचं असेल, स्वतः चं नाव करायचं असेल तर ह्याने ठामपणे तिच्या पाठीशी राहून खंबीरपणे तिला सपोर्ट केला पाहिजे! तिच्या प्रत्येक चांगल्या गोष्टी चं त्याने आनंदाने कौतुक केलं पाहिजे...तिला होणाऱ्या प्रत्येक वेदनेचे औषध शोधण्यासाठी तो नेहमी धडपडला पाहिजे.त्याने तिला जगातील सर्व सुख नाही जरी दिली तरी चालेल पण तिच्यावर नेहमी माया लावून ,तिला कधिच एकटं न पाडता नेहमी तिला जीव लावला पाहिजे.तिच्या योग्य गोष्टींचा त्याने सत्कार केला पाहिजे.घरातील महत्वाच्या निर्णयासाठी त्याने तिला सुद्धा बोलण्याची संधी दिली पाहिजे. असं खूप काही मुलींच्या आई वडिलांना जावई बापू कडून अपेक्षित असते..🤗
मी परफेक्ट जावई बनेल की नाय मला नाही माहीत, पण मी माझा पूर्ण प्रयत्न करेन की माझी लाईफ पार्टनर जी पण असेल तिला कधीच माझ्यामुळे मान खाली घालायची गरज पडणार नाही. ती जेव्हा माझ्या सोबत असेल तेव्हा तिला जगातील सर्वात सुरक्षित ठिकाणी आपण आहोत असं फील होईल असं माझं वर्तन राहील..माझ्याकडे पैसा असो व नसो, माझं ज्या पण व्यक्ती सोबत लग्न होईल मी तिला कधीच दुःखात राहू देणार नाही. कष्टाचं महत्व मी जाणतो.. मी कष्ट करेल आणि तिची प्रत्येक गरज पूर्ण करेन.मला कोणतंही वाईट व्यसन नाही,मी एक छोटा विचारवंत आणि लेखक,कवी आहे.मी तिच्या साठी शायरी करेन तिला खळखळून हसवण्याचं कसब शिकेन..तिने बनवलेल्या प्रत्येक डिश वर नाचून आनंद व्यक्त करेल पण तिला कधीच नाराज होऊ देणार नाही..🥰 मी आणि माझ्या फॅमिली ने लाईफ मध्ये खूप अडचणी बघितल्या आहेत. पण आता जेव्हा माझी लाईफ कायमस्वरूपी सेटल होत आहे तेव्हा मी स्वतःचा विचार करणं सुरू केला आहे.मला लफडेबाजी बिलकुल आवडत नाही.हो, कॉलेज लाईफ मध्ये मी अनेक मुलींशी बोलायचो, पण त्यावेळेस मला टाईमपास आणि प्रेम मध्ये फरक कळत नव्हता. आज मला त्या सर्व गोष्टींची चीड वाटते..मुळात मी टाईमपास मटेरियल च नाहीये! आता माझं सगळं क्लिअर टू क्लिअर चालते.मी ठरवलं आहे की जसं मला सक्सेस भेटेल तसाच मी सगळं लाईफ सेटल करून मग माझी लाईफ पार्टनर माझ्या लाईफ मध्ये रिस्पेक्ट ने आणणार!😍 आज मला माझी लाईफ पार्टनर कोण असेल हे माहीत नाही, पण तरी माझं माझ्या फ्युचर लाईफ पार्टनर वर खूप खूप खूप प्रेम आहे आणि मी क्षणा क्षणाला तिच्या विचारात राहतो. पण सोबतच मी माझ्या करिअर बद्दल ही खूप सिरीयस आहे.कारण करिअर झाल्याशिवाय मी माझ्या लाईफ मध्ये कोणालाही जागा देण्याचा विचार सुद्धा करू शकणार नाही.आज मी संयम आणि स्वतः वर विश्वास ठेवून ते करत आहे जे करोडो मधून एकाच व्यक्ती ला झेपू शकते किंवा समजू शकते.त्यासाठी मी माझा दृष्टिकोन आणि माझं सॉफ्टवेअर वारंवार अपडेट केलेलं आहे😝...
लग्न म्हणजे नुसतं मुलं जन्मास घालणं इतकंच नसते! तर आपल्या साथीदाराला जीवनात पदोपदी आनंद आणि समाधान देऊन एकमेकांना मरेपर्यंत साथ मिळावी म्हणून केलेला प्रपंच असतो लग्न...दोन कुटुंबांना एकत्र जोडून आनंदाचं वातावरण तयार करणारं जगातील सर्वात सुंदर नातं म्हणजे लग्न..नवरा बायको चं नातं...माझं माझ्या लाईफ पार्टनर वर खूप खूप खूप प्रेम आहे...मग ती कोणीही असो, मला काही फरक पडत नाही.जर मला कोणी मुलगी पसंत असली तर मी सक्सेस होऊन नियमशिर पणे तिच्या घरी जाऊन मागणी घालेन आणि जर तिच्या घरून नकार दिला तर मी माझ्याकडून होईल तितकं त्यांना सांगून बघेन, तरी नकार भेटला तर मी तिला तिथंच विसरून जाईल आणि दुसऱ्या मुली चा विचार करेन. हे लग्नाच्या आधी प्रेम गिम टाईमपास करणं ,गुलुगुलु करणं मला जमत नाही, लग्न झालं की मी ओन्ली तिच्यावर च तसं प्रेम करेन.🥰 जोपर्यंत माझं करिअर ची ग्यारंटी मला होत नाही तोपर्यंत मी शांतपणे राहील. देवाची मला साथ आहे, म्हणूनच मला इतकं सुंदर मन भेटलं, इतकं सुंदर विचार विश्व भेटलं. आता मला काही मोहमाया नाही. माझं माझ्या मनावर मास्टर कंट्रोल आहे.🤗
Comments
Post a Comment