मी खूश आहे कारण मी समोरच्याकडून जास्त अपेक्षा ठेवत नाही..!🥰😃
दुःखाचं मूळ कारण- अति जास्त अपेक्षा...
कोणत्याही व्यक्ती शी आपण काही तरी मोबदला भेटलाच पाहिजे ह्या हिशोबाने वागणं हे खरं दुःखाचं कारण असावं... समजा, मला एखादी मुलगी आवडली आणि मी तिच्याकडून अपेक्षा लावून ठेवल्या की तिने सुद्धा मला पसंद केलंच पाहिजे! जर त्या मुलीला आपण पसंद नसलो तर मग आपल्याला त्या गोष्टी चा त्रास होतो. कोणाची थोडी जरी मदत करायची म्हटलं तर समोरच्याने आपण केलेल्या मदती च्या मोबदल्यात आपल्याला अमुक अमुक दिलं पाहिजे ह्या अपेक्शेला बाळगून आपण जर मदत करत असलो तर त्याचा त्रास आपल्याला पुढं जाणवतो..माझ्या लाईफ मध्ये मी फक्त स्वतः कडून च योग्य वागण्याची अपेक्षा ठेवत असतो.कारण मला माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि स्वतःच्या मनाची ग्यारंटी आहे.पण इतरांकडूनची सेम च वागणूक मिळेल ह्याची ग्यारंटी मला नसल्याने मी कोणाकडून ही कसलीच अपेक्षा करत नाही.मी सर्वांना प्रेम देतो,रिस्पेक्ट देतो पण कधीच त्यांच्याकडून ही तेवढंच प्रेम आणि रिस्पेक्ट मला मिळालीच पाहिजे अशी अपेक्षा मी ठेवत नाही. म्हणूनच मी खूप खुश जीवन जगत आहे. मला कोणाच्याही कोणत्याही गोष्टीचा जास्त राग येत नाही कारण मी अपेक्षा ठेवणं च बंद केलं.😍जिथं गेलो तिथं कोणी न कोणी आवडणारे भेटते, पण जरुरी नाही की समोरच्या व्यक्तीलाही तुमचे गुण आवडलेच पाहिजे! मी तरी ठाम मताचा आहे की कोणत्याही व्यक्ती शी इमोशनली जास्त जुडायचं नाही! आणि जुडायचं ही असेल तर आपली मर्यादा ओळखून वागायचं. लिमिटेड भावना व्यक्त करायच्या आणि समोरच्या व्यक्ती ला कायम रिस्पेक्ट द्यायची.
Comments
Post a Comment