वाईट वेळ बदलण्यासाठी आधी स्वतः ला बदलावं लागेल...



  आयुष्यात तुम्ही जितके जास्त चांगले कामं करून ठेवले असतील, त्यांचा परतावा देव योग्य वेळेवरच करतो याची प्रचिती मला नेहमीच आली...मी गेल्या 12 वर्षांपासून वेगवेगळ्या ठिकाणी कामं केली. तिथं आणि आजूबाजूला कोणी गरजू व्यक्ती किंवा भीक मागून पोट भरणारी म्हातारी माणसं बघून मला नेहमी खूप वाईट वाटायचं...जवळ थोडं फार असलं तर मी दहा वीस देऊन मदत करायचो.त्यावेळेस माझ्या मनात यायचं की आज आपण यांना दहा ची मदत करतोय, उद्या देव आपल्या साठी दहा लाखाची व्यवस्था करेल!🥰पेराल तसं उगवेल अशी गोष्ट आहे.कोणाचं वाईट केलं की योग्य वेळेवर फळ भेटते. देव किंवा नियती परीक्षा घेतात आणि आपल्याला अनुभवांतून अजून मजबूत बनवतात.समोरच्याकडुन कोणतीही अपेक्षा न करता कोणाची तरी मदत करून बघा राव, खरं समाधान तिथंच भेटते...!देतो तो देव, आपण फक्त निमत मात्र आहोत..जितकं द्याल , तितकं जास्त मिळवाल, हा निसर्गदेवते चा नियम आहे.पेरलं तसं उगवते हे खरंच आहे.. आज रोजी चार चार माणसं तुमच्याकडे काही न काही आशा लावून आहेत.त्यांच्या आशा अपेक्षा आणि उत्सुकतेचा काय रिजल्ट द्यायचा हे आपल्या ला ठरवणं आहे.आज चा खराब टाईम जर बदलायचा असेल तर आधी त्या वेळेची इज्जत करणं शिकलं पाहिजे.वेळ बदलण्यासाठी तसे निर्णय देखील घ्यावे लागतील आणि त्यासाठी स्वतः ला निरनिराळ्या प्रकारच्या अभ्यासातून सक्षम ही बनवावे लागते.अपेक्षेप्रमाणे च सगळं नसते होत, थोडं संयम आणि स्वतःच्या विश्वासा ने आयुष्याची ही पाऊलवाट चालायची असते..

*G.K.SHELKE*
PROUD FOUNDER OF ONPASSIVE I.T.COMPANY

Comments

Popular posts from this blog

लग्न म्हणजे... (भाग १)

कठीण परिस्थिती

बड़ी अच्छी है तनहाई...!