हे गर्लफ्रेंड आणि प्रेम वगैरे माझ्या बस ची बात नाहीच!

कॉलेज लाईफ मध्ये अनेक मुलींशी बोललो. पण त्यावेळेस अनुभव आला आणि मला सिद्ध झालं की मी काही ह्या टाईमपास गोष्टी करण्यासाठी या जगात आलेलो नाही. काही नसते ते प्रेम गिम! फालतू टाईम वेस्ट असतो. 10 पैकी एखादी जोडी यशस्वी होते.मनाला कोणी थोडं जरी चांगलं वाटलं तर त्यालाच प्रेम समजतात ह्या पिढीची मुलं मुली.मी सुद्धा त्यातच जमा होतो कॉलेज लाईफ ला असताना.पण मला इतकं समजत होतं की हे सगळं आकर्षण आहे प्रेम नव्हे.एकमेकांना समजून न घेता नुसत्या चेहऱ्यावर, लुक्स वर भाळून त्याला प्रेम समजणे म्हणजे निववळ मूर्खपणा आहे.मी कधीच असलं प्रेम नाय केलं.हो मी भटकलो जरूर असेल पण कधी त्यात जास्त डीप नाय गेलो.आपली परिस्थिती आणि आपली कृती याचा ताळमेळ ठेऊन च मी वागत आलो. आता मी एका इंटरनॅशनल आय टी कंपनी चा संस्थापक सदस्य आहे. एकदा ही कंपनी लॉन्च झाली की मग मला पसंद असलेल्या मुलीला मी डायरेक्ट हात मागायला जाईल. पण रिकामा बोलण्यात, कॉल्स मध्ये टाईम घालणार नाही.तेवढा वेळ माझ्या कडे नाही.

Comments

Popular posts from this blog

लग्न म्हणजे... (भाग १)

कठीण परिस्थिती

बड़ी अच्छी है तनहाई...!