त्याच धर्माला माणुसकी नाव देऊ...
ते विचार, ते आचार जगण्यात घेऊ,
सदधर्म अन भूतदयेला शिखरास नेऊ,
हे कर्म देतील फळं हवी तशी,
त्याच धर्माला माणुसकी नाव देऊ...
सत्कर्म घडो ,न राहो अपेक्षा,
न ज्वलन कोणावर न होवो उपेक्षा,
अंतःकरनाणे समभाव ठेवू,
त्याच धर्माला माणुसकी नाव देऊ...
न जात न पंथ न राजा न रंक,
चारित्र्यावर कसलाही ठेवू न कलंक,
व्यसनासुराला पार धूळ देऊ,
त्याच धर्माला माणुसकी नाव देऊ...
स्वाभिमान न दुखवू कुणाचा,
न ठेवू कोणावर कडु भाव न वाचा,
दयेच्या सुर्या ला उदयास नेऊ,
त्याच धर्माला माणुसकी नाव देऊ...
❤️🇮🇳G.K.SHELKE 🙏🏻🙂💐
Comments
Post a Comment