लग्न म्हणजे..... (भाग ६ )

लग्न म्हणजे..... (भाग ६ )  

    लग्न वाटते तितकी सोपी गोष्ट नाहीये. ज्याचं झालं आहे त्याला ते बरोब्बर समजले असेल. एका नवीन जीवाला आपल्या घरी आयुष्यभर आपल्या सोबत घेऊन राहणं आणि मानसिक,शारीरिक तसेच संवेदनशील गोष्टींना बॅलन्स करून सांभाळणे हेही इतकं सोप्पं नाही.आज मी भलेही लग्न न करताच इतकं सगळं लग्नावर लिहून ठेवलं आहे, पण त्या गोष्टींची खरी प्रचिती मला तेव्हाच येईल जेव्हा माझं लग्न होईल.😁 पण जितकं लिहलंय ते सारे खरं आहे हे नक्की. आपल्या आयुष्यात कोणीतरी नवीन व्यक्ती येते आणि जीवनाचा एक अविभाज्य भाग बनून जाते. ज्या व्यक्तीला आपण कधी भेटलो नाही, बोललो नाही, तिचा स्वभाव आपल्याला माहीत नाही त्या व्यक्तीची निवड जेव्हा आपल्या घरचे आपला आयुष्याचा जोडीदार म्हणून करतात त्यावेळेस त्या दोघांनाही काय फिल होत असेल ते तर अरेंज मॅरेज वालेच जाणतात.. लग्नाची सुपारी फुटली की मग त्याच मुला मुली सोबत फोन ने कनेक्ट होऊन फोन वर बोलायची सवय असो वां नसो तरी टाईम काढून मन मोकळं करत राहणे सुरू होते. लग्न जमल्यावर एकमेकांना जाणून घेऊनही लग्न तर होणारच आहे.... खरं तर लग्न जमण्या आधीच एकमेकांना नीट ओळखता यावं यासाठी एखादी सिस्टीम असली पाहिजे असं मला नेहमी वाटतं. लग्न खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळे ते ठरवताना एक चांगली पारदर्शक सिस्टीम असली पाहिजे. ज्याप्रमाणे काही नोकऱ्या मिळण्यासाठी पूर्वपरीक्षा द्याव्या लागतात तसच लग्नासाठी मुलांना आणि मुलींना लिखित स्वरूपात पेपर आणि नंतर इंटरव्ह्यू द्यायची सिस्टीम आणली तर कदाचित काही फरक पडेल.😁🤔 लग्नानंतरही एकमेकांना समजून घेण्यासाठी नवरा बायको साठी एखादा एम सी क्यू टाईप आणि दिर्घोत्तरी पेपर असला तर किती मजा येईल😉. म्हणजे आपली आवड निवड , जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन, नात्यात अपेक्षित साथ, परिस्थिती नुरुप एखाद्या विषयावर एकमेकांची मते इत्यादी जाणून घेण्यासाठी परीक्षा असली तर अजून छान प्रकारे जोडीदार एकमेकांना समजून घेऊ शकतात. 
    लग्नासाठी योग्य जोडीदाराची जितकी गरज मुलींना असते तितकीच गरज मुलांना देखील असते.त्यामुळं एकमेकांना समजून घेण्यासाठी होईल तितकं पारदर्शक होऊन विचारपूस करायला हवी. आपले गुण दोष, स्वभावातील कमी, कमजोरी किंवा नात्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा आहे हे मोकळ्या मनाने एकमेकांना कळवले तर आपोआपच पुढचा प्रवास सुरळीत होतो.लग्नानंतर मुलींसाठी सर्वात महत्वाचा त्यांचा नवरा असतो. बाकी कोणी साथ देवो अथवा न देवो, पण आपला नवरा आपल्या मागे सदैव उभा राहिला पाहिजे असं त्यांना अपेक्षित असतं...दिवसभर घरची कामं करून पतीची प्रेमळ साथ आणि त्याची तिच्या बद्दल ची विचारपूस तिच्या साठी खूप मोठ्या संजीवनी चे काम करते. तिचा सगळा थकवा तिथंच दूर होतो. नवरा दिवसभर काम करून कितीही थकलेला असला तरी घरी गेल्यावर बायको ला भेटल्यावर तोही रिलॅक्स फिल करतो. तेवढं सामंजस्य दोघांत निर्माण व्हायला पाहिजे.नात्यात जितका मोकळा संवाद साधला जातो तितकेच गैरसमज कमी होतात किंवा त्यांना जागा राहत नाही. कामाचा ताण घरी आणि घरचा ताण कामावर नेऊ नये म्हणजे झालं...

 *लेखक - ग.का.शेळके (G.K.SHELKE)*

Comments

Popular posts from this blog

लग्न म्हणजे... (भाग १)

कठीण परिस्थिती

बड़ी अच्छी है तनहाई...!