लग्न म्हणजे ....(भाग २)
*लग्न म्हणजे......(भाग २)*
मी स्वतःला खूप नशीबवान समजतो की लग्नाबाबत घेतलेल्या चुकीच्या निर्णयांचा परिणाम मला लग्न न करताच अनुभवायला मिळत आहे. निरिक्षणातून आपण येणाऱ्या आयुष्याचे संवेदनशील निर्णय घेण्यासाठी स्वतः ला लायक बनवू शकतो.माझ्या माहिती मध्ये असेही काही जोडपे आहेत ज्यांचा संसार लोकांना खूप चांगला चालताना दिसतोय , पण त्यांच्यात विचारांची तफावत आणि घुसमट बघायला मिळते. जसे की बऱ्याच ठिकाणी मुलींना फक्त संसारातच दाबून ठेवलं जातं , त्यांना त्यांच्या करिअर बद्दल विचारही करायचा म्हटला तर नवऱ्याची आणि घरच्यांची परवानगी घ्यावी लागते. पण असेही अनेक घरे आहेत जिथं मुलींना सून म्हणून नव्हे तर लेक म्हणून वागवलं जातं, त्यांच्या स्वप्नांची काळजी घेतली जाते व ती पूर्ण करण्यासाठी त्यांना सपोर्टही केला जातो. असं काही बघितलं की खरच खूप चांगलं वाटतं.😊 लग्नाआधी जी मुलगी स्वतः च्या घरी वाटेल तसे बोलू शकते , वागू शकते, तसे तिला लग्नानंतर करता येत नाही. मुलगा मात्र लग्नाआधी आणि नंतरही हवं तसं वागू शकतो. काही घरांत मुलगा चांगला असतो पण सासू सासरे आगाऊ निघतात. तर काही घरी सासू सासरे चांगले मायाळू भेटतात पण नवरा दुष्ट प्रवृत्तीचा निघतो. साले लग्नाआधी किती चांगले वागतात आणि किती चांगल्या चांगल्या गोष्टी करतात पण लग्न झाल्यावर काही महिन्यांतच ते त्यांचा रंग दाखवणे सुरू करतात. काही घरी मुलगा, सासू सासरे सारे खूप चांगले असतात पण दुर्दैवाने त्यांना दुष्ट प्रवृत्तीची बायको,सून भेटते.ती त्यांच्या प्रेम आणि मायेची किंमत करत नाही आणि घरात क्लेश पसरवण्याचे काम करत फिरते. खरचं भो,लग्न म्हणजे मजाक नसतेच !🙁
मुळात माझा लग्नाला विरोध नाहीच! माझीही लग्नाची इच्छा आहेच! पण लग्नासाठी आवश्यक आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या परिस्थिती बद्दल मी चिंतित आहे. कारण माझ्या अनेक मित्रांचे आणि मैत्रिणींचे याच गोष्टीनं नुकसान झालं आहे. काहींच्या घरच्यांच्या चुकीच्या निवडीमुळे त्यांचं आयुष्य बिघडलं तर काहींच्या चुकीच्या वेळी आणि व्यक्ती सोबत लव्ह मॅरेज केल्याने करिअर आणि जगणं कठीण होऊन बसलं... नवीन पिढीला थोडं जरी टोचून बोललं तर त्यांना सहन होत नाही हा मोठा प्रोब्लेम आहे.आपण सासू सासऱ्याला दोष देतो खरी, पण प्रत्येक वेळी ते वाईट किंवा चुकीचे नसतात. त्यांना देखील मुलगी असते , त्यांना देखील एका मुलीच्या सासरवासाबद्दल जाणीव असते.(काही दुष्ट प्रवृत्तीचे लोकं सोडून😒) ..हल्लीच्या पिढीला इगो प्रॉब्लेम खूप आहे हे नाकारता येत नाही. याला कारण म्हणजे मुला मुलींचा आवश्यकतेपेक्षा होणारा जास्तीचा लाड! ईच्छा केली अन् हवं ते आणून दिलं की ही पिढी डोक्यावर चढणारच! लाडाने येडे होतात बरेच जण ! घरच्यांनी थोडे काही कडक शब्दात समजावून सांगितलं तर काही मुली माहेरी जाऊन बसतात आणि त्यांना खूप त्रास दिला जातोय असं वर्तवतात... पूर्वीसारखं आताच्या बऱ्याच अंशी पिढीला लग्नाबद्दल गांभीर्य वाटत नाही. हे कटू सत्य आहे.
हल्ली लव्ह मॅरेज चे प्रमाण खूप वाढताना दिसत आहे. ज्यांना मुली भेटत नाही त्यांनी एखादी मुलगी पटवावी आणि तिला पळवून नेऊन लग्न करून घ्यावं असाही सल्ला काही माय बापं आपल्या मुलांना गंमती गमतीत देताना मी बघितलं आहे.(मी पण त्यांच्यातलाच एक 😆) खरं तर माझ्यात हे प्रेम आणि लव्ह मॅरेज करण्या इतकी हिम्मत नाही बुवा... मी खूप ट्राय करून बघितला पण मला कोणी सिरियस प्रेम करणारं नाही भेटलं. कदाचित माझ्या मध्ये काही कमी असेल किंवा माझा चांगलेपणा समोरच्या व्यक्तीला समजला नसेल... मी लग्नाच्या हिशोबाने मुलगी बघायचो अन् समोरच्या व्यक्ती टाईम पास म्हणून .... ओह,असो, आपण लग्नावर परत येऊ. तर लग्न म्हणजे गरज कमी आणि जबाबदारी जास्त असते. दोन फॅमिलीज ना एकत्र आणून त्यांच्यात विचारांची आणि संस्कारांची देवाणघेवाण घडवण्याचं काम हे सिस्टीम करत असतं.. होय, लग्न म्हणजे मला एक सिस्टीमच वाटते. खूप काळजीने आणि जबाबदारी ने तिला हॅण्डल /ऑपरेट करावं लागते. छोट्या छोट्या गोष्टींना समजून घेऊन रिॲक्ट करावं लागते. राग आणि प्रेमाचं बॅलन्स राखून संसार चालवावा लागतो. प्रसंगी आपल्या आवडी निवडी समोरच्या च्या कन्फर्ट झोन प्रमाणे बदलून वागावं लागतं..
*लेखक - ग. का.शेळके(G.K.SHELKE)*
Comments
Post a Comment