लग्न म्हणजे ..... (भाग ५)

*लग्न म्हणजे ..... (भाग ५)* 

  लग्नाचे आपण दोन प्रकार पाडतो. एक *अरेंज मॅरेज* आणि दुसरा म्हणजे *लव्ह मॅरेज..!*  ज्या गोष्टी भाग ४ मध्ये मी स्पष्ट केल्या, त्यातील बरेच प्रॉब्लेम्स अरेंज मॅरेज च्या तुलनेत लव्ह मॅरेज मध्ये सॉल्व होतात. कारण लव्ह मॅरेज च्या आधीपासूनच मुलगा मुलगी एकमेकांच्या स्वभाव आणि बारीक सारीक गोष्टी नीट जाणून घेत असतात. बरेच प्रेम विवाह सक्सेस होताना मी पाहत आलेलो आहे. अरेंज मॅरेज मध्ये मुलगा मुलगी एकमेकांना खरे तर लग्नानंतर बरोबर ओळखण सुरू करतात. लव्ह मॅरेज मध्येही असेच होते म्हणा. जेव्हा दोघं काही महिने एकमेकांच्या सहवासात राहतील तेव्हाच त्यांच्या प्रेमाची खरी परीक्षा सुरू होते. आपण एकमेकांना खरच नीट ओळखतो का, व्यवस्थित सांभाळू शकतो का हे तेव्हा समजते. लव्ह मॅरेज मध्ये मुला मुलीला त्यांच्या निर्णयाला योग्य ठरवण्यासाठी त्यांच्या नात्याला होईल तितकं सुरक्षित आणि सुंदर करण्यासाठी प्रयत्न करणे महत्वाचे वाटते. लग्नाचे हे दोन्ही प्रकार आपापल्या ठिकाणी योग्यच आहेत. पण तुलनेने लव्ह मॅरेज जास्त सुरक्षित वाटते.कारण आयुष्याचा जोडीदार स्वतः लाच निवडता यावं असे स्वातंत्र्य तिथं असते. अरेंज मॅरेज प्रमाणे जात, धर्म, प्रॉपर्टी किती आहे, किती कमवतो, किती शिकला वगैरे वगैरे चौकशा प्रेमात केल्या जात नाहीत. प्रेम म्हणजे एकमेकांना आतून समजून घेणं असते. पण हल्ली लव्ह मॅरेज चा वेगळाच अनर्थ ह्या नवीन पिढीकडून काढला जात आहे असे वाटते.मुव्हीज मधल्या प्रेमाचे अनुकरण करत स्टाईल मारणारा, गाडी घेऊन फिरणारा मुलगा पसंद करताना मुली आढळतात.  हे प्रेम लव्ह मॅरेज ला न्याय देऊ शकत नाही हे नक्की. अशांचे लव्ह मॅरेज जास्त काळ टिकू शकत नाही. कारण ती सिरियस नेस त्यांच्यात नसते. नवीन पिढी तडका फडकी निर्णय घेण्याच्या नादात स्वतः च नुकसान करू शकते हे दिसून आलं आहे .खूपच कमी लोक लव्ह मॅरेज चा खरा अर्थ जाणतात आणि तेच आज सुखी आहेत. एक चांगल्या मनाची व्यक्ती आयुष्याचा जोडीदार म्हणून लाभण्यासाठी हल्ली प्रेम केले जाते का? टाईमपास च जास्त चालतो फक्त.. माझा ह्या गोष्टीत जास्त रस राहिलेला नाहीय कारण मी ते सगळ जवळून अनुभवलय.. धोकेबाजी, फसवणूक, खोटे बोलून दुसरीकडे टाईमपास करणे, तात्पुरत्या सुखासाठी कोणाच्या भावनांशी खेळणे असे फालतू प्रकार बघितल्यावर कोणाला या फिलिंग वर विश्वास उरेल? प्रत्येकाला नाही भेटत खरं प्रेम... ज्याला भेटलं त्याने त्याची किंमत केली पाहिजे. जोडीदार असा निवडावा जो आपल्या सोबतच आपल्या आई वडील आणि फॅमिली ला सोबत घेऊन चालू शकेल. नुसते सुंदर दिसणे, देखावे, स्टाईल मारणारा जोडीदार काय कामाचा ?
      काही मुले खूप चांगल्या मनाची असतात. पण त्यांची परिस्थिती त्यांना प्रेम वगैरे चा विचार करण्याची परवानगी देत नाही. अनेकदा मनाला खूप आवरूनही ही मुले प्रेमात पडतात, पण कालांतराने त्यांना त्यांच्या परिस्थितीचे भान होते की सद्यस्थितीत आपलं फोकस यावर नाही तर आपल्या कामावर असलं पाहिजे... त्यांना हे सगळं करण्यासाठी वेळ नसतो. असो, तर जे खरे प्रेम करतात ते एकमेकांना कोणत्याही परिस्थितीत साथ देतात. त्यांचं लग्न टिकवण्यासाठी ते दोघंही कष्ट घेतात. एकमेकांच्या सर्व इच्छा ते एकमेकांना मोकळ्या मनाने सांगू शकतात हे अरेंज मॅरेज मध्ये *बऱ्याचदा* शक्य होत नाही....जिथं मोकळा संवाद होतो तिथेच नातं टिकतं.. जिथं आपली मते विचार व्यक्त करताना समोरच्या चा स्वभाव आडवा येतो तिथं तसं शक्य होत नाही ही वस्तुस्थिती आहे. आजचा तरुण वर्ग पैसा कमविण्याठी जितकी मरमर करतो तितकंच त्याने स्वतः चे व्यक्तिमत्व घडविण्यासाठी करायला पाहिजे. एक चांगली व्यक्ती म्हणून जगण्यासाठी तो काय काय करू शकतो हे त्याने बघितलं पाहिजे. व्यसनं, चिडीमारी, बेइमानी तसेच इतर सर्व चुकीचे मार्ग सोडून एक जबाबदार, दयाळू, प्रेमळ, शांत, सर्वधर्म सहिष्णू, मानवतावादी, विवेकशील व्यक्तिमत्व अंगिकारलं तर नक्कीच दुसऱ्या घरची मुलगी आपल्या घरी आली की तिचं जीवन सुंदर होऊ शकतं...

 *लेखक - ग.का.शेळके (G.K.SHELKE)*

Comments

Popular posts from this blog

लग्न म्हणजे... (भाग १)

कठीण परिस्थिती

बड़ी अच्छी है तनहाई...!