Posts

Showing posts from June, 2022

हे गर्लफ्रेंड आणि प्रेम वगैरे माझ्या बस ची बात नाहीच!

Image
कॉलेज लाईफ मध्ये अनेक मुलींशी बोललो. पण त्यावेळेस अनुभव आला आणि मला सिद्ध झालं की मी काही ह्या टाईमपास गोष्टी करण्यासाठी या जगात आलेलो नाही. काही नसते ते प्रेम गिम! फालतू टाईम वेस्ट असतो. 10 पैकी एखादी जोडी यशस्वी होते.मनाला कोणी थोडं जरी चांगलं वाटलं तर त्यालाच प्रेम समजतात ह्या पिढीची मुलं मुली.मी सुद्धा त्यातच जमा होतो कॉलेज लाईफ ला असताना.पण मला इतकं समजत होतं की हे सगळं आकर्षण आहे प्रेम नव्हे.एकमेकांना समजून न घेता नुसत्या चेहऱ्यावर, लुक्स वर भाळून त्याला प्रेम समजणे म्हणजे निववळ मूर्खपणा आहे.मी कधीच असलं प्रेम नाय केलं.हो मी भटकलो जरूर असेल पण कधी त्यात जास्त डीप नाय गेलो.आपली परिस्थिती आणि आपली कृती याचा ताळमेळ ठेऊन च मी वागत आलो. आता मी एका इंटरनॅशनल आय टी कंपनी चा संस्थापक सदस्य आहे. एकदा ही कंपनी लॉन्च झाली की मग मला पसंद असलेल्या मुलीला मी डायरेक्ट हात मागायला जाईल. पण रिकामा बोलण्यात, कॉल्स मध्ये टाईम घालणार नाही.तेवढा वेळ माझ्या कडे नाही.

वाईट वेळ बदलण्यासाठी आधी स्वतः ला बदलावं लागेल...

Image
  आयुष्यात तुम्ही जितके जास्त चांगले कामं करून ठेवले असतील, त्यांचा परतावा देव योग्य वेळेवरच करतो याची प्रचिती मला नेहमीच आली...मी गेल्या 12 वर्षांपासून वेगवेगळ्या ठिकाणी कामं केली. तिथं आणि आजूबाजूला कोणी गरजू व्यक्ती किंवा भीक मागून पोट भरणारी म्हातारी माणसं बघून मला नेहमी खूप वाईट वाटायचं...जवळ थोडं फार असलं तर मी दहा वीस देऊन मदत करायचो.त्यावेळेस माझ्या मनात यायचं की आज आपण यांना दहा ची मदत करतोय, उद्या देव आपल्या साठी दहा लाखाची व्यवस्था करेल!🥰पेराल तसं उगवेल अशी गोष्ट आहे.कोणाचं वाईट केलं की योग्य वेळेवर फळ भेटते. देव किंवा नियती परीक्षा घेतात आणि आपल्याला अनुभवांतून अजून मजबूत बनवतात.समोरच्याकडुन कोणतीही अपेक्षा न करता कोणाची तरी मदत करून बघा राव, खरं समाधान तिथंच भेटते...!देतो तो देव, आपण फक्त निमत मात्र आहोत..जितकं द्याल , तितकं जास्त मिळवाल, हा निसर्गदेवते चा नियम आहे.पेरलं तसं उगवते हे खरंच आहे.. आज रोजी चार चार माणसं तुमच्याकडे काही न काही आशा लावून आहेत.त्यांच्या आशा अपेक्षा आणि उत्सुकतेचा काय रिजल्ट द्यायचा हे आपल्या ला ठरवणं आहे.आज चा खराब टाईम जर बदलायच...

मी खूश आहे कारण मी समोरच्याकडून जास्त अपेक्षा ठेवत नाही..!🥰😃

Image
दुःखाचं मूळ कारण- अति जास्त अपेक्षा... कोणत्याही व्यक्ती शी आपण काही तरी मोबदला भेटलाच पाहिजे ह्या हिशोबाने वागणं हे खरं दुःखाचं कारण असावं... समजा, मला एखादी मुलगी आवडली आणि मी तिच्याकडून अपेक्षा लावून ठेवल्या की तिने सुद्धा मला पसंद केलंच पाहिजे! जर त्या मुलीला आपण पसंद नसलो तर मग आपल्याला त्या गोष्टी चा त्रास होतो. कोणाची थोडी जरी मदत करायची म्हटलं तर समोरच्याने आपण केलेल्या मदती च्या मोबदल्यात आपल्याला अमुक अमुक दिलं पाहिजे ह्या अपेक्शेला बाळगून आपण जर मदत करत असलो तर त्याचा त्रास आपल्याला पुढं जाणवतो..माझ्या लाईफ मध्ये मी फक्त स्वतः कडून च योग्य वागण्याची अपेक्षा ठेवत असतो.कारण मला माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि स्वतःच्या मनाची ग्यारंटी आहे.पण इतरांकडूनची सेम च वागणूक मिळेल ह्याची ग्यारंटी मला नसल्याने मी कोणाकडून ही कसलीच अपेक्षा करत नाही.मी सर्वांना प्रेम देतो,रिस्पेक्ट देतो पण कधीच त्यांच्याकडून ही तेवढंच प्रेम आणि रिस्पेक्ट मला मिळालीच पाहिजे अशी अपेक्षा मी ठेवत नाही. म्हणूनच मी खूप खुश जीवन जगत आहे. मला कोणाच्याही कोणत्याही गोष्टीचा जास्त राग येत नाही कारण मी अपेक्षा ठेवणं च ...

सक्सेस,माझं लग्न आणि माझी लाईफ पार्टनर......😃🙏🏽

Image
माणूस त्याच्या आयुष्याला स्वतःच प्रयत्नांनी घडवत असतो हे तर सर्वांनाच माहीत असेल.असाच निर्णय मी नोव्हेंबर 2020मध्ये घेतला आणि जगातील सर्वात मोठ्या आंतराष्ट्रीय लेव्हल वर लॉन्च होत असलेल्या टोटल इंटरनेट सोल्युशन देणाऱ्या आय टी कंपनी चा एक जबाबदार संस्थापक सदस्य बनलो.🤗 हा झाला माझ्या येणाऱ्या सक्सेसफुल लाईफ चा पाया. आता ह्याच भक्कम पायावर माझी पुढची सर्व स्वप्न आणि इच्छा अवलंबून आहेत .सरळ आणि सोपी गोष्ट आहे की ज्या व्यक्ती कडे अशी मोठी पोजिशन असेल आणि त्याला त्याबद्दल सगळं समजून सक्सेस होणारच हे अनेक अनुभवांतून कळलं असेल तर त्याच्या लग्नाचा इश्यू च राहणार नाही.एका मुलीच्या आईवडिलांना त्यांच्या होणाऱ्या जावयामध्ये काय हवं असतं? तो हुशार असो व नसो पण त्याला कुठलंही व्यसन नसावं. त्याच्या घरी जमीन जुमला असो व नसो, पण स्वतः चं कर्तृत्व आणि जबाबदार व्यक्तिमत्त्व त्याच्याकडे असावं.त्याच्या घरी त्याची इज्जत केली गेली पाहिजे जेणेकरून त्यांच्या मुलीला सुद्धा तेवढी इज्जत भेटेल.त्यांच्या मुलीला नेहमी समजून घेणारा व्यक्ती असावा. तिला जर पुढं शिकायचं असेल, स्वतः चं नाव करायचं असेल तर ह्याने ठामपणे ति...

माझ्या भाषेत देव कसा आणि कोण?

Image
मी दैवापेक्षा माझ्या निर्णयांवर जास्त विश्वास ठेवतो. वास्तव परिस्थिती चा अभ्यास करून च मी माझं प्रत्येक पाऊल ठेवत असतो.माझ्या स्टेटस ला तुम्हाला जास्त  कोण्या महापुरुषांच्या जयंती निमित्त किंवा देवाधर्मानिमित्त फोटो व्हिडीओ दिसणार नाहीत. कारण माझ्यासाठी माझं कर्म आणि मी करत असलेले लोकांच्या भल्या साठीचे सातत्याचे प्रयत्न हेच देवस्वरूप आहेत.देवाने शरीर दिलं त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी करणं हेच आपल्या धर्मांनि आणि महापुरुषांनी शिकवलं.पण हल्ली त्यांच्या विचारा ऐवजी नुसता त्यांचे भक्त असल्याचा देखावा मिरवला जातो ...देव आपल्या समोर संधी मांडतो मान्य आहे, पण त्या संधीचं काय करायचं, ती स्वीकारायची की नाकारायची हे निर्णय आपण घेतो म्हणून आपलं यशापयश ठरत असतं..वास्तवात देव ही एक अमूर्त संकल्पना आहे जिला काही स्वार्थी लोकांनी 8 हात देऊन, 10 तोंड देऊन अर्थाचा अनर्थ करून टाकला!... माझ्यामते जे काही चांगलं असेल ते देव आहे आणि जे वाईट असेल ते राक्षस ...देव प्रत्येक ठिकाणी असतो.हवा,अन्न,पाणी,माती,आग,दगड धोंडे,वनस्पती असा मिळून जो खरा देव तयार होतो त्याचं नाव आहे "निसर्ग"....  ...