Posts

Thought

आपले विचार हीच आपली ओळख असते.  आपलं अस्तित्व च त्यानुसार ठरत असतं.  स्वाभिमान आणि सद्सद्विवेक बुद्धी हीच सर्वात मोठी संपत्ती.

।।न भूतो न भविष्यते।।

।।न भूतो न भविष्यते।। 💕💕💕💕💕💕💕 ONPASSIVE  न नेटवर्क मार्केटिंग है, न एम एल एम है, न चैन सिस्टीम, न शेयर मार्केटिंग है, न क्रिप्टो है, न कोई इन्वेस्टमेंट स्किम है, और न ही किसी प्रकार का ट्रेडिशनल मार्केटिंग है!🤔😲 फिर यह क्या है?🤭 यह है इंटरनेट सॉल्यूशन्स मार्केटिंग! यह है दुनिया का नया अविष्कार! यह है नई खोज जिसे इंटरनेट क्रांति भी कहा जा सकता है!  अब इंटरनेट क्रांति का मतलब?🤔😲 मतलब- इंटरनेट टुल्स ,सॉफ्टवेयर तथा ऍप्लिकेशन्स बनाकर दुनिया को सबसे सस्ते और सुपर टेक्नोलॉजी के टुल्स उपलब्ध कराना! 😃 अब ONPASSIVE के सॉफ्टवेयर तथा इंटरनेट टुल्स कौन कौनसे रहेंगे? 🤔🤔😲 जैसे फेसबुक है वैसा O NET, फोन पे जैसा O WALLET, ZOOM को टक्कर देगा O CONNECT, ऑनलाइन एज्युकेशन का O CADEMY आदि सभी प्रकार के जितने भी टुल्स अभी मार्केट में उपलब्ध है उन से भी बेहतर और सुपर टेक्नोलॉजी के साथ ONPASSIVE के 50 से भी ज्यादा इंटरनेट टुल्स मार्केट को हिलाने आ रहे है! बात जरा हजम होने के लिए मुश्किल है ना ?🤭मुझे भी कहा हज़म हुई थी! लेकिन सभी तरह की इन्फॉर्मेशन लेने और प्रत्यक्ष अनुभवों के बाद आज मै...

कसा बसा भेटला जन्म

Image
  कसा बसा भेटला जन्म .... कसा बसा भेटला जन्म , वाया त्याला घालू नका , अति तिथंच माती होते , हे मात्र विसरू नका ... लाख मोती हिरे असतील , अभिमान जास्त बाळगू नका , माणुसकीची भिंत अशी ही सहजतेने पाडू नका ... गरम मनाने ; गरम डोक्याने , निर्णय जास्त घेऊ नका , तरुणपणाचं रक्त हे असं , जास्त उसळी मारू नका .. होतात अनर्थ होतात पापं , चुकीची संगत धरू नका .. मायबापांचं नाव असे हे , धुळीत मिसळून टाकू नका .. होतील चुका हि खूप साऱ्या , पण वारंवार चुकू नका .. एकच धडा घेऊन शहाणा , नम्रपणा सोडून राहू नका .. येतील दिवसही चांगले आपले , विश्वास मनाचा सोडू नका , अन माणुसकीची नाती आपली , आपुलकी कमी करू नका .. G.K.SHELKE , FOUNDER MEMBER OF ONPASSIVE LLC COMPANY ... LAUNCHING SOON... 1 G.K. Shelke Gofounder Onpassive

दाटून येतं मन ...

Image
दाटून येतं मन ....     दाटून येतं  मन , रडून जातं  काळीज ,  सुखदुःखाच्या या वाटेवर ,  चुकते कधी बेरीज ..  अडचण राहते मोठी ,  पण परिस्थिती राहते छोटी ,  काय  होईल कसं  होईल , वाटत राहते भीती ...  हळव्या ह्या भावना ,  कमजोर करती मना , अपेक्षा भंग इतके होऊन ,  तुटून जातो माणसाचा कणा ....  नशिबाची कसोटी ही ,  चालूच राहते सदा ,  जी राहतील शांत नेहमी ,  त्यांचाच जास्त फायदा ...  अनुभवांतून घ्यावी शिकवण ,  एवढंच आजचं  सार , मनच आपलं जर नसेल चांगलं ,  तर काय पैशांचा घालणार खार ??                       गणेश काशिनाथ शेळके ,  FOUNDER MEMBER OF ONPASSIVE  INFORMATION TECHNOLOGY COMPANY .  

REAL SUCCESS...

 खरे यश कसे? यश म्हणजे फक्त नोकरी ला लागणं , पैसा कमवणे, शेत असणे आणि मोठं घर असणं एवढंच का? समजा मी हे सगळंच मिळवलं , आणि माझ्यात सद्गुण , चांगले वर्तन च नसले तर ते माझं यश ठरेल का? जर माझ्याकडे वरील सर्व गोष्टी असतील तर मुलीच्या घरच्यांना त्यांची मुलगी मला देतांना काही वाटणार नाही बरोबर ना. पण जर माझ्याकडे एवढं सगळं राहून पण  माझी वागणूक चांगली नसेल आणि माझ्या मनात स्त्रियांचा आदरच नसेल तर त्यांनी मला त्यांची मुलगी देणं योग्य ठरेल का? आज मी शून्य आहे, माझ्याकडे एवढा पैसा नाहीये आणि शेत सुद्धा नाहीये , स्वतःच्या पायावर मी उभा नाही अजून . पण माझ्या मनात चांगले विचार असतील, मुलींची इज्जत असेल, वडीलधाऱ्यांचा आदर असेल,  परोपकार मला माहित असेल, लाईफ पार्टनर ला लाईफ टाईम जीव लावण्याची आणि तिच्या छोट्या छोट्या इच्छा व तिचा आत्मसमान जपण्याची क्षमता माझ्यात असेल तर मी यशस्वी नक्कीच राहील हे माझं मत आहे.. तुम्हाला काय वाटते? जेव्हा एक बाप आपल्या मुलींसाठी मुलगा बघतो तेव्हा भौतिक गोष्टींचा च जास्त विचार करतो.पोरगा किती शिकलाय, नोकरीला आहे का, घरी शेत आहे का, घर कसं आहे, पगार किती म...

Real Success

प्रेम भावना part 1

Image
 प्रेम .... !!    प्रेम काय असतं  कसं  असतं  हे सांगणं मोठं गोंधळाचं काम वाटतं  मला . कारण प्रेम इतकं व्यापक आहे कि त्याच्यामुळेच जगातील सर्व नाते एका भावनिक बंधनात बांधले गेलेले आहेत . आजच्या तरुण पिढीला जेव्हा प्रेम काय असतं  त्याची ग्रेटनेस काय आहे , तेच कळत नसतं  तरी त्यांना प्रेम कसं होतं कुणास ठाऊक ... मी शाळेपासून तर कॉलेज पर्यंत च्या माझ्या आयुष्यात भरभरून जीवन जगलो. बऱ्याच वेळा प्रेम हा शब्द कानी पडला . मग वरून पिक्चर्स वगैरे बघून सुद्धा प्रेम नेमकं काय असतं  याचा शोध घेण्याची तीव्र इच्छा होऊ लागली . तर शेवटी प्रेम म्हणजे काय असतं ते  मला अनुभव घेतल्या नंतर कळलं .... जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांना भेटतात , तेव्हा त्यांच्यात बॉण्डिंग होण्याचं कारण म्हणजे त्यांना हवी असलेली मनासारखी , समजून घेणारी व्यक्ती मिळाली आणि तीच व्यक्ती आपल्याला आनंद देऊ शकते असे त्या दोघांच्याही मनात जेव्हा त्यांचा मेंदू महाशय फिक्स करून टाकतो , तेव्हापासून जी भावनिक , ग्रेट आणि जगातील सर्वात सुंदर आणि आनंददायी गोष्ट हृदयाला साद घालू लागते ..  माझ...

लग्नाबद्दल..

 काही गोष्टीचं मला कधीकधी खूप हसू येतं. जसं की लग्न!  आय मिन ,लग्न करणं म्हणजे आजकाल फॅशन च झाली आहे असं वाटत नाही का? म्हणजे घरच्यांना वाटू लागते की मुलाचं वय झालंय तर लग्न लावून टाकू म्हणजे घरी स्वयंपाकात मदत करायला आणखी दोन हात मिळतात... आणखी मुलाला जबाबदार जर बनवायचं असेल तर त्याचं लग्न लावून टाकायचं ही तर प्रथाच बनवलीय लोकांनी! प्रत्येक मुलगा त्या मापात कसा काय बसू शकतो? सोयरिकी पण अशा अशा जमतात की काय सांगावं! लग्न करूच नका असं थोडी म्हणतो मी? पण लग्नाच्या लायकीचे आहात का याचं परीक्षण कोण करते?  लग्न म्हणजे गंमत करून ठेवली आहे लोकांनी! आणि त्याहूनही मोठी गंमत म्हणजे मागे पुढं काही न बघता लग्नाच्या एका वर्षातच मुल जन्मास घालणं!  मग त्यासाठी आपण जबाबदार आहोत का, ती मुलगी शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या तयार आहे का, या गोष्टींचा किती जण विचार करतात? लोकांच्या घरी पाळणा हलतो,  लगेच इकडं ह्यांचं मन हलू लागतं! कधी कधी मनात विचार येतो की हे लग्न करणं कंपल्सरी असते का? ... ज्यांचं खरंच आर्थिक ,मानसिक तसेच कौटुंबिक बाबतीत व्यवस्थित असेल त्यांनीच लग्नाचा विचार केल...