Posts

जवळ पैसा असला तर...

#जवळ_पैसा_असला_तर ... माणूस कायपण करू शकतो... नवीन कपडे,चपला बूट घेऊन आत्मविश्वासानं बोलू शकतो... शिक्षण, नोकरी गिकरी अन छोकरी सगळं काही मिळवू शकतो... कोणालाही नीचा दाखवू शकतो.. त्याच्या पोरांना कामं गिमं न करताही त्यांच्या म्हत्वाकांक्षा,काहीतरी वेगळं करण्याची इच्छा, नाव मिळवण्याची इच्छा अन बरंच काही पूर्ण करता येतं.. पैसा असला तर इकडं तिकडं कामं न करता एखादी रूम करून म्हणा किंवा बाईक घेऊन म्हणा mpsc वगैरे च्या शिकवण्या घेता येतात... जवळ पैसा असल्यावर चार चौघांच्या कामीही पडता येतं... आपल्या पोरांना मोठया मोठ्या शहरात शिकायला पाठवता येतं... गरज पडली तर पैसे भरून पोरांना नोकरी ला लावता येतं... पैसा असला की दीड महिन्याचं कागदपत्र दोन दिवसातच बोलावून घेता येतं... पैसा असला मुलांना तर मोठया थाटात ,हिंमतीने कुठंही फिरायला जाता येतं... आता तर लग्न करायचं म्हटलं तर रंगाचीआणि प्रेम होण्याची काही कारण नाही फक्त पैसा असेल तर चटकन सोयरीक गियरीक करता येते..काही ताण राहत नाही... पैसा असला तर शेती विकत घेऊन बागबागायत फुलवता येते, संपत्तीत अजून भर टाकता येते.. पैसा असला तर कुणालाह...

HAPPY BIRTHDAY VAIBHAV

Image
WISH   YOU MANY MANY HAPPY RETURNS OF THE DAY MY YOUNGER BRO....💐💐🙏🏽🇮🇳😎 माझ्या प्रिय भावा,     तू माझ्यापेक्षा अडीच वर्षाने लहान जरी असला तरी कधी मला तसं वाटू दिलं नाहीस.बाकीचे लहान भाऊ त्यांच्या मोठ्या भावाला नेहमी अभ्यासात म्हणा,इतर गोष्टींत म्हणा विचारतात पण तू मला तेव्हढी पण तकलीफ देऊ केली नाहीस.मी नेहमी माझं मन तुला मेसेज ने व्यक्त करत राहीलो पण तू कधी तुझे प्रॉब्लेम्स मला सांगून मला टेन्शन दिलंच नाहीस.मी फक्त शिक्षण घेत राहिलो पण तू शिक्षण सोडून कामाच्या मागे लागलास आणि स्वतः ची एक  चांगला वेल्डिंग कामगार म्हणून मित्रांमध्ये ख्याती मिळवलीस.तुझी जेवढी तारीफ करावी तेवढी कमीच .तुझी सुंदर भारी भक्कम शरीरयष्टी तुझ्या निरंतर व्यायाम आणि कसरतीचे उत्तम फळ आहे.तुझ्यासारखा संयम आणि कामामध्ये एकाग्रता मी कधीच पहिली नाही.तू एक उत्तम माणूस आहेस.नेहमी दुसऱ्यासाठी मदतीला विना तक्रार तयार असतोस.तुझा तो  दिलदार स्वभाव आणि काय तो रुबाब!.. तुझा तो कमी वयातील व्यावहारीक जीवनाचा अनुभवी अभ्यास मला अजून भावतो. एक मोठा भाऊ  म्हणून मी कधीच तुझ्यावर हक्क दाखवू श...

MY LIFE STYLE

माझा इयत्ता 7-8 वी पासून  शाळेत आणि त्यानंतर कॉलेजमध्ये असताना पहिला नंबर यायचा.पण लोकांना आणि माझ्या मित्रांनाही गैरसमज की हा खूप हुशार आहे आणि याला खूप काही येतं.पण तसं काही नव्हतं.खरं तर मला वाचनाची प्रचंड आवड होती.नवीन इयत्तेला प्रवेश करण्यापूर्वी च मी पुस्तके विकत घ्यायचो आणि भराभर उत्सुकतेने वाचून काढायचो.मराठी ची सर्व धडे,कविता आणि सुभाषिते मला खूप आवडायचे म्हणून ते माझ्या लवकर लक्षात रहायचे.त्याचप्रमाणे बाकी विषयांवर ही मी आवडीने लक्ष द्यायचो. जिथं आवड असते तिथं जास्त अभ्यासाची आवश्यकता भासत नाही.म्हणून मी परीक्षेत मनापासून माझ्या स्वतःच्या शब्दांत उत्तरे लिहायचो. त्यामुळं दर वर्षी चांगले मार्क्स मिळायचे आणि नकळतपणे प्रथम क्रमांक ही मिळायचा.पण मी कधीही सर्वात जास्त गुण मिळावेत,आणि प्रथम क्रमांक मिळावा या हेतूने शिक्षण घेतलंच नाही.ते तर आवडीमुळे मला चांगलं लिहायची सवय लागली होती.इंग्रजी आणि मराठी या दोन विषयात मी जास्त रस घ्यायचो त्यामुळेच त्यात जास्त मार्क्स भेटले की टक्केही जास्त पडायचे.मला नेहमी छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायची आवड होती.मी कधीच स्वतः ला जास्त हुशार स...

म्हाताऱ्याचं दुःखं...

#म्हाताऱ्याचं_दुःख.. - ग.का.शेळके       तरुणपणी मी खूप कामं केली.अंगाला नेहमी काम करत राहण्याची सवय झाली होती.घरी खूप जमीन होती,परंतु काही कारणास्तव वाडवडिलांनी विकून टाकली.मी खूप लहान असतानाच माझं लग्न लावलं गेलं.त्यावेळेस संसार काय असतो हे कुणाला माहीत होतं? पण सुंदर मनाची जोडीदारीण भेटली आणि आयुष्य अजून सुंदर बनलं.बघता बघता दोन मुलं आणि एक सालस मुलगी झाली. त्यांच्यासाठी आयुष्य जगत आलो. दुर्दैवाने पत्नीच्या आयुष्यासाठी तिच्या आजारपणात इलाजासाठी  जमीन विकावी लागली.पोरांच्या आईच्या जिवापेक्षा जमीन काही जास्त नाही असं वाटलं.वर्षामागे वर्षे लोटली आणि पोरं जवानीत  अली.पण मोठा मुलगा कमी वयातच व्यसनाच्या मागे लागला.वाईट संगतीत राहून शिवीगाळ करणं शिकला.जबाबदारी ची त्याला जाणीव वाटेनाशी झाली.या परिस्थितीत लोकांचं ऐकलं, पोराचं लग्न लावून द्या तरच ते सुधारेल काहीतरी.. भोळ्या भाबड्या आम्ही मायबापानी त्याचं लगीन लावून दिलं.पण तरी त्याची वागणूक बदलत नव्हती.दारू च्या पायी बायोकोलाही तो त्रास देऊ लागला. जिणं मुश्किल करून टाकलं. म्हणून काळजावर दगड ठेवून त्याला बायोकोसह घराबाहे...

दिल खोल के खुशी मना मेरे दोस्त,

Image
आयुष्य कुठपर्यंत साथ देईल हे सांगता येत नाही...  पण जितकं जगायचं न, सालं मोकळं हसून जगायचं..! घरातल्या, दारातल्या ,कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टीकडे गंमतीने लक्ष द्यायचं !.. सिरीयस चेहरा ठेवून आपल्यावर प्रेम करणाऱ्या ला उदास कशाला बरं करायचं..? एन्जॉय करत राहायचं, प्रत्येक घटनेकडे पोजिटिव्हली बघायचं... पोरीने धोका दिला, घरचे त्रास देतात, दिवस बोर जातो, कोणी भाव देत नाही, हे सारे साले बहाणे आहेत जीवनातले आपल्याला एन्जॉय पासून परावृत्त करण्यासाठी ! पैसे कमवायचेत ,घर चालवायचंय, जबाबदारी जास्त आहे, घरचा मोठा आहे, लोकं नाव ठेवतात, ह्या असल्या छटाक कारणामुळे स्वतः ला गमावू नका,  प्रत्येक दिवस आनंदाने जगण्यासाठी ,कुणाला तरी हसवण्यासाठी, त्याला आपण आहोत असं स्पेशल वाटण्यासाठी काहीतरी करावं, असं काहीतरी आपल्या वागण्यात पाहिजे ! निसर्गाने दिलेल्या शरीर संपत्तीचा महत्वाचा भाग म्हणजे आपला चेहरा. मग तो कसाही असला तरी तो आपल्या स्वतः साठी जगातला सर्वात सुंदर चेहरा असला पाहिजे ! फेकून द्या साला तो न्यूनगंड ! की मी दिसायला असा, तसा ! ज्याचं मन नेहमी दुसऱ्याला आनंदात पाहून खुश होतं...

कोरोना लॉकडाऊन

Image
जन्म माणसाचा भेटला पण मानवाने नाही केली कदर, प्रदूषण तर करतच होता पण कोरोनाचाही आणला कहर... जहर खायला पैसे नव्हते वरून लॉकडावून आले, उधारीमध्ये दुकानदार किमती वाढवू लागले, सहकार्याची ची गरज आता करायला पाहिजे मदत, पण काही जणांची काही करून हिंडण्याची सुटत नाही आदत... माणसानेच केलं निर्माण हे जगावेगळं संकट, आता तरी सावध व्हारे परिस्थिती होण्याआधी बिकट... पूर्ण माहिती नसतानाही मेसेज  देतात पाठवून, अफवा पसरवून टाकतात सगळ्या देतात घाबरवून... काही करतात रिकाम्या गोष्टी, फालतू चर्चा घडवून, नावं ठेवतात  सरकारला, नियम सारे तुडवून... गोंधळ हा कोरोना चा जाणार नाही लवकर, कारण ऐकत नाहीत लोक काही  फिरत आहेत रस्त्यावर... लॉकडाऊन चं करून समर्थन घरीच थांबू आपण, सोशल मीडिया तर्फे घेऊन ज्ञान, करू माणुसकीचे सांत्वन..                   -   ग.का.शेळके

हक्क कोणता...

Image
हक्क कोणता सांगू मी, तुझ्यावर अन तुझ्या मनावर, अंतःकरण रिते झाले अन भाव झाला अनावर, जीव होतो कासावीस अन  मन होते गहिवर...    -ग.का.शेळके

मुलांना फक्त मोठं करून कर्तव्य संपत नाही..

मुलं जर सुधरण्याचा प्रयत्न करत असतील तर आई वडिलांचं कर्तव्य आहे की त्यांना समजून घ्यावं.त्यांच्या चुकांबद्दल कर्कशपणे ओरडून ओरडून त्याचं डोकं खराब करण्यापेक्षा त्याना  शांत चित्ताने प्रेमानं बोलून समजावून सांगितलं तर ते  तुमचं नक्कीच ऐकतील किंवा थोडं समजून तरी घ्यायचा प्रयत्न करतील..पण जर तुम्ही त्यांच्या एखाद्या चुकीवर वारंवार बडबड बडबड सुरूच ठेवत असाल,वारंवार त्यांना त्याच चुकीची आठवण करून देत असाल,तर ते सुधरणार तर नाहीच नाही ; पण त्यांचा सुरू असलेला प्रयत्नही ते बंद करून टाकतील...       तुम्ही त्यांच्यासाठी कितीही केलं,कितीही दिवस रात्र काम करून त्यांना हवं ते दिलं तरी मी वर बोलल्याप्रमाणे जर तुम्ही त्यांना समजून न घेता तसे वागले,तर माफ करा साहेब, त्यांना बिघडायला बिलकुल वेळ लागणार नाही.मुलगा जर खूप शिकूनही बेरोजगार राहत असेल तर त्याबद्दल त्याच्यावर ओरडत राहिल्यापेक्षा त्याला एकांतात नेऊन त्याच्या पाठीवर मायेचा हात ठेवून बस थोडं प्रेमानं त्याचा प्रॉब्लेम विचारल्यास त्याला कन्फरटेबल होईल आणि तो त्याचं मन तुमच्या जवळ मोकळं करेल.पण दुर्दैवाने असे पालक खूप कमी ...