Posts

लग्नाबद्दल..

 काही गोष्टीचं मला कधीकधी खूप हसू येतं. जसं की लग्न!  आय मिन ,लग्न करणं म्हणजे आजकाल फॅशन च झाली आहे असं वाटत नाही का? म्हणजे घरच्यांना वाटू लागते की मुलाचं वय झालंय तर लग्न लावून टाकू म्हणजे घरी स्वयंपाकात मदत करायला आणखी दोन हात मिळतात... आणखी मुलाला जबाबदार जर बनवायचं असेल तर त्याचं लग्न लावून टाकायचं ही तर प्रथाच बनवलीय लोकांनी! प्रत्येक मुलगा त्या मापात कसा काय बसू शकतो? सोयरिकी पण अशा अशा जमतात की काय सांगावं! लग्न करूच नका असं थोडी म्हणतो मी? पण लग्नाच्या लायकीचे आहात का याचं परीक्षण कोण करते?  लग्न म्हणजे गंमत करून ठेवली आहे लोकांनी! आणि त्याहूनही मोठी गंमत म्हणजे मागे पुढं काही न बघता लग्नाच्या एका वर्षातच मुल जन्मास घालणं!  मग त्यासाठी आपण जबाबदार आहोत का, ती मुलगी शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या तयार आहे का, या गोष्टींचा किती जण विचार करतात? लोकांच्या घरी पाळणा हलतो,  लगेच इकडं ह्यांचं मन हलू लागतं! कधी कधी मनात विचार येतो की हे लग्न करणं कंपल्सरी असते का? ... ज्यांचं खरंच आर्थिक ,मानसिक तसेच कौटुंबिक बाबतीत व्यवस्थित असेल त्यांनीच लग्नाचा विचार केल...

अशांना मुलगी देऊच नाही...

 #अशांना #मुली #देऊच #नाही... नसेल हाताशी काम काही, पोराचं लग्न लाऊच नाही, नसेल अक्कल मुलाला काही, चारित्र्य त्याचं सुंदर नाही, पोराचं लग्न लाऊच नाही, व्यसनात नेहमी डूबत राही, फालतू कामे करत राही, अशांसाठी मुली बघूच नाही, स्वतः चे निर्णय घेतच नाही, स्त्रियांना सम्मान देतच नाही , अपशब्द नेहमी तोंडी राही, अशांचे लग्न लाऊच नाही... जबाबदारी ची जाणीव नाही, आळस सगळा मनात राही, अशांना मुली देऊच नाही... मेहनत ज्याला जमत नाही, इमानदारी गमत च नाही, उगाच भांडण करत राही, वाईट संगतीत फिरत राही, अशांना मुली देऊच नाही... अशांना मुली देऊच नाही...            गणेश काशिनाथ शेळके,               २९/०३/२०२१

कठीण परिस्थिती

 माझं ठरलेलं आहे, जोपर्यंत स्वतः आर्थिकदृष्ट्या तसेच मानसिकदृष्ट्या जबाबदार बनत नाही. तोपर्यंत लग्नाच्या ध्यानी लागायचं नाही. हल्ली विचारांचे प्रवाह खूप च उलट्या दिशेने वाहतांना मी बघितले. सासू सुनांमध्ये छटाक छटाक गोष्टींवरून वाद होताना मी पाहिले. आजच्या आणि कालच्या पिढीतील विचारांचा हा विरोधाभास खूपच वाईट प्रभाव टाकत आहे असं मला प्रकर्षाने जाणवते आहे..जर समोरच्या येणाऱ्या पिढीला ही जुनी पिढी जुन्याच मापात धरून त्यांच्या मनासारखं वागण्यासाठी  अपेक्षा ठेवत असेल तर खूप अवघड आहे!...आणि येणारी नवीन पिढी म्हणजे सून ,जोपर्यंत स्वतः च्या मतलबाच्या पलीकडे विचार करणार नाहीत तोपर्यंत अनेक घटस्फोट, अनेक दुरावे, अनेक कुसंवाद  टाळता येणे जवळपास अशक्य होऊन जाईल... चुका कोण करत नाही?  मी तर खूप चुकतो. पण चुकल्यावर माफी मागून प्रेमानं एकमेकांना समजून घेणाऱ्या सास सुना बघायला भेटणं म्हणजे आजकाल दुर्मिळ गोष्ट झाली आहे. छोट्या छोट्या गोष्टी, ज्या हिने माझ्या मनासारख्या केल्या पाहिजेत, हिने समजून घेतलं पाहिजे, हिनेच लक्ष दिलं पाहिजे असे तोरे मिरवणाऱ्या बाया स्वतः च्याच हाताने मुलाचं आय...

बोला बोर झालं की काय करता?

 #तुम्हाला #बोर  #झालं कि तुम्ही #काय काय# #करता ???#       मी तर माहोल करतो !!! मी दिवसभर कस्टमर्स हॅन्डल करतो . त्यामध्ये बारा प्रकारचे बारा  माणसं  रोज भेटतात. त्यांच्या बारा प्रश्नांचे उत्तर बारा प्रकारे द्याव लागतं . हल्ली खूप ताणतणाव आहे इतकं कोरोना लॉक डाऊन च्या भानगडी मूळे सर्वांचं टेन्शन अजून वाढलं आहे . जीवनामध्ये आपण  रोज दैनंदिन कामे करून आपल्याला थकवा जाणवतो , तो थकवा घालवण्यासाठी अनेक मार्ग आपण अवलंबतो ; कोणी टीव्ही ला चिपकून बसते , कोणी बेड ला  तर कोणी फोन ला !! प्रत्येकाजवळ काही ना काही मनोरंजनाचे साधन असते . परंतु मित्रांनो आपल्याला असं एक साधन आवश्यक असतं  ज्यामुळं आपलं मानसिक आरोग्य समृद्ध झालं पाहिजे . टीव्ही वर चे सिरियल्स तसेच इतर कार्यक्रमांमुळे लोकांच्या मनावर विपरीत परिणाम होतो हे मी बऱ्याच  लोकांच्या निरीक्षणातून अनुभवलं.. कोणता कार्यक्रम बघायला हवा हेही तितकेच महत्वाचं असतं . माझं कसंय  ,मी दिवसभर कामातच इतका एन्जॉय करून घेतो कि मला जास्त थकवा जाणवतच नाही . घरी आलो कि मी थोडा फ्रेश होतो आणि  थोडा...

वास्तव आहे

 खात खात धक्के ती, म्हातारपणात आली होती, कमावलेल्या इस्टेटीची, झोळी रिकामी झाली होती, जीव तिचा एकटा दुकटा, धाकामध्ये आला होता, कारण तिचा म्हातारा तिला  अचानक सोडून गेला होता... काळ तिचा सुद्धा येणार, हे तिला ठाऊक होतं, इस्टेटीची वाटप केल्याशिवाय, जीव तिचा सुटणार नव्हता... सक्के पोरं - सुना मारत होते ताणें, एकट्या जिवाने कुठं सांगावं गाऱ्हाणे... श्रावण बाळ योजनेसाठी म्हातारी  आफिसांत फिरत होती, करून द्या हो लवकर काम, वारंवार विनवत होती. तरुणपण ते तरुणपण , म्हातारपण लय अवघड असतं, चिडचिडेपणा अन हेवा देवा, यांचं सगळं मिश्रण असतं... आयुष्य सरते मुलांसाठी, स्वतः साठी काही उरत नाही, म्हाताऱ्यांना काही काही, जगण्यातला आनंद मिळत नाही... घाऊक इच्छा किरकोळ जखमा घेऊन, म्हातारपण ते सरत असतं, अन प्रत्येक गल्लीत एक म्हातारी अन एक म्हातारं झुरत असतं..      G.K.SHELKE  10.01.2021

20 December 2020

  जिंदगी की सवाल का जवाब ढूँढता हु, पास आए पलो का हिसाब ढूँढता हु, कितने गम है कितनी खुशी है, उन तमाम लम्हों की किताब ढूँढता हु।        G.K.SHELKE

जवळ पैसा असला तर...

#जवळ_पैसा_असला_तर ... माणूस कायपण करू शकतो... नवीन कपडे,चपला बूट घेऊन आत्मविश्वासानं बोलू शकतो... शिक्षण, नोकरी गिकरी अन छोकरी सगळं काही मिळवू शकतो... कोणालाही नीचा दाखवू शकतो.. त्याच्या पोरांना कामं गिमं न करताही त्यांच्या म्हत्वाकांक्षा,काहीतरी वेगळं करण्याची इच्छा, नाव मिळवण्याची इच्छा अन बरंच काही पूर्ण करता येतं.. पैसा असला तर इकडं तिकडं कामं न करता एखादी रूम करून म्हणा किंवा बाईक घेऊन म्हणा mpsc वगैरे च्या शिकवण्या घेता येतात... जवळ पैसा असल्यावर चार चौघांच्या कामीही पडता येतं... आपल्या पोरांना मोठया मोठ्या शहरात शिकायला पाठवता येतं... गरज पडली तर पैसे भरून पोरांना नोकरी ला लावता येतं... पैसा असला की दीड महिन्याचं कागदपत्र दोन दिवसातच बोलावून घेता येतं... पैसा असला मुलांना तर मोठया थाटात ,हिंमतीने कुठंही फिरायला जाता येतं... आता तर लग्न करायचं म्हटलं तर रंगाचीआणि प्रेम होण्याची काही कारण नाही फक्त पैसा असेल तर चटकन सोयरीक गियरीक करता येते..काही ताण राहत नाही... पैसा असला तर शेती विकत घेऊन बागबागायत फुलवता येते, संपत्तीत अजून भर टाकता येते.. पैसा असला तर कुणालाह...

HAPPY BIRTHDAY VAIBHAV

Image
WISH   YOU MANY MANY HAPPY RETURNS OF THE DAY MY YOUNGER BRO....💐💐🙏🏽🇮🇳😎 माझ्या प्रिय भावा,     तू माझ्यापेक्षा अडीच वर्षाने लहान जरी असला तरी कधी मला तसं वाटू दिलं नाहीस.बाकीचे लहान भाऊ त्यांच्या मोठ्या भावाला नेहमी अभ्यासात म्हणा,इतर गोष्टींत म्हणा विचारतात पण तू मला तेव्हढी पण तकलीफ देऊ केली नाहीस.मी नेहमी माझं मन तुला मेसेज ने व्यक्त करत राहीलो पण तू कधी तुझे प्रॉब्लेम्स मला सांगून मला टेन्शन दिलंच नाहीस.मी फक्त शिक्षण घेत राहिलो पण तू शिक्षण सोडून कामाच्या मागे लागलास आणि स्वतः ची एक  चांगला वेल्डिंग कामगार म्हणून मित्रांमध्ये ख्याती मिळवलीस.तुझी जेवढी तारीफ करावी तेवढी कमीच .तुझी सुंदर भारी भक्कम शरीरयष्टी तुझ्या निरंतर व्यायाम आणि कसरतीचे उत्तम फळ आहे.तुझ्यासारखा संयम आणि कामामध्ये एकाग्रता मी कधीच पहिली नाही.तू एक उत्तम माणूस आहेस.नेहमी दुसऱ्यासाठी मदतीला विना तक्रार तयार असतोस.तुझा तो  दिलदार स्वभाव आणि काय तो रुबाब!.. तुझा तो कमी वयातील व्यावहारीक जीवनाचा अनुभवी अभ्यास मला अजून भावतो. एक मोठा भाऊ  म्हणून मी कधीच तुझ्यावर हक्क दाखवू श...