Posts

Email - shelkeg93@gmail.com

लग्न म्हणजे ..... (भाग ८)

Image
*लग्न म्हणजे....* *(भाग ८)*     लग्नाचा जोडीदार निवडताना अनेक गोष्टीं आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. अरेंज मॅरेज असेल तर आपल्या घरच्यांना आणि जर स्वातंत्र्य असेल तर मुला मुलींना सुद्धा याचा स्वतः निर्णय घेता आला पाहिजे. हल्ली लग्नाची बोलणी सुरू झाल्यावर लगेच साखरपुडा किंवा एंगेजमेंट करण्यासाठी घाई केली जाते. म्हणजे एकदा जर का एंगेजमेंट झाली तर मुलगा मुलगी एकमेकांना भेटायला, बोलायला मोकळे...! मग कॉल व्हिडिओ कॉल सुरू होतात. हल्लीचे मुलं मुली फोनवर बोलताना जे महत्त्वाचे आहे ते बोलतच नाहीत. म्हणजे तुझा आवडता हिरो कोणता, तुला कुठे हिंडायला जावंयास आवडते, वगैरे वगैरे अशा टाइमपास गोष्टी केल्या जातात.. त्यापेक्षा एकमेकांचा स्वभाव कसा आहे, काय काय सवयी आहेत, चांगले गुण कसे आहेत, कोणती वाईट सवय आहे, अमुक अमुक परिस्थितीमध्ये मी जर असा वागलो, अशी वागले तर तुम्ही /तू काय करसाल/करशील, समजा माझी ननंद, सासु अशी अशी असेल तर मी कसं वागायला पाहिजे, माझे सासरे माझे साले अमुक अमुक वागले तर मी कसा वागायला पाहिजे इत्यादी गोष्टी फोनवर किंवा भेटल्यावर बोलल्या जातात का?.. क्वचितच नवीन मुलं मुली ...

लग्न म्हणजे.... (भाग ७)

Image
*लग्न म्हणजे.....* *(भाग ७)*        बेरोजगारी, व्यसन, शिक्षणाचा अभाव, वाढती स्त्री भ्रूणहत्या, मुलींचे उच्च शिक्षण आणि त्यातून झालेली जागृती, कमजोर आर्थिक परिस्थिती, शेतीचा अभाव, छोटे घर, बदनामी चे व्यक्तिमत्व,शारीरिक विदृपता, लग्ना बद्दल पाळलेले गैरसमज, इत्यादी मुलांचे लग्न न जमण्याची कारणं असू शकतात. *आधुनिकतेकडे* झुकलेल्या समाजाची लग्ना बाबत मुलांकडून वाढती अपेक्षा हे सुद्धा बऱ्याच मुलांचं लग्न न जमन्या मागचं कारण आहे. घरी शेतजमीन असावी, नोकरीला असावा, गाडी असावी, शिक्षण असावं, इत्यादी अपेक्षा.  मुलगा निर्व्यसनी आहे का, त्याचा स्वभाव कसा आहे, स्त्रियांचा आदर करतो का, कष्टाळू आहे का, आपल्या मुलीच्या हिशोबाने योग्य राहिल का इत्यादी गोष्टीही बघितल्या गेल्या पाहिजेत. दुर्दैवाने बऱ्याच वेळा मुलाचा स्वभाव आणि ह्या समाजाच्या अपेक्षा मेळ खात नाही... गरीब किंवा सामान्य  घरातील पण स्वभाव, कर्तृत्व आणि चारित्र्याने सुंदर असलेल्या मुलाला आपली मुलगी देण्याचं रिस्क खूपच कमी लोकं घेतात. सुखापेक्षा समाधान महत्वाचं असतं. पैसा कितीही असो ,पण नवराच व्यसनी किंवा फाटक्या चार...

लग्न म्हणजे..... (भाग ६ )

Image
लग्न म्हणजे..... (भाग ६ )       लग्न वाटते तितकी सोपी गोष्ट नाहीये. ज्याचं झालं आहे त्याला ते बरोब्बर समजले असेल. एका नवीन जीवाला आपल्या घरी आयुष्यभर आपल्या सोबत घेऊन राहणं आणि मानसिक,शारीरिक तसेच संवेदनशील गोष्टींना बॅलन्स करून सांभाळणे हेही इतकं सोप्पं नाही.आज मी भलेही लग्न न करताच इतकं सगळं लग्नावर लिहून ठेवलं आहे, पण त्या गोष्टींची खरी प्रचिती मला तेव्हाच येईल जेव्हा माझं लग्न होईल.😁 पण जितकं लिहलंय ते सारे खरं आहे हे नक्की. आपल्या आयुष्यात कोणीतरी नवीन व्यक्ती येते आणि जीवनाचा एक अविभाज्य भाग बनून जाते. ज्या व्यक्तीला आपण कधी भेटलो नाही, बोललो नाही, तिचा स्वभाव आपल्याला माहीत नाही त्या व्यक्तीची निवड जेव्हा आपल्या घरचे आपला आयुष्याचा जोडीदार म्हणून करतात त्यावेळेस त्या दोघांनाही काय फिल होत असेल ते तर अरेंज मॅरेज वालेच जाणतात.. लग्नाची सुपारी फुटली की मग त्याच मुला मुली सोबत फोन ने कनेक्ट होऊन फोन वर बोलायची सवय असो वां नसो तरी टाईम काढून मन मोकळं करत राहणे सुरू होते. लग्न जमल्यावर एकमेकांना जाणून घेऊनही लग्न तर होणारच आहे.... खरं तर लग्न जमण्या आधीच एकमेकांना ...

लग्न म्हणजे ..... (भाग ५)

Image
*लग्न म्हणजे ..... (भाग ५)*    लग्नाचे आपण दोन प्रकार पाडतो. एक *अरेंज मॅरेज* आणि दुसरा म्हणजे *लव्ह मॅरेज..!*  ज्या गोष्टी भाग ४ मध्ये मी स्पष्ट केल्या, त्यातील बरेच प्रॉब्लेम्स अरेंज मॅरेज च्या तुलनेत लव्ह मॅरेज मध्ये सॉल्व होतात. कारण लव्ह मॅरेज च्या आधीपासूनच मुलगा मुलगी एकमेकांच्या स्वभाव आणि बारीक सारीक गोष्टी नीट जाणून घेत असतात. बरेच प्रेम विवाह सक्सेस होताना मी पाहत आलेलो आहे. अरेंज मॅरेज मध्ये मुलगा मुलगी एकमेकांना खरे तर लग्नानंतर बरोबर ओळखण सुरू करतात. लव्ह मॅरेज मध्येही असेच होते म्हणा. जेव्हा दोघं काही महिने एकमेकांच्या सहवासात राहतील तेव्हाच त्यांच्या प्रेमाची खरी परीक्षा सुरू होते. आपण एकमेकांना खरच नीट ओळखतो का, व्यवस्थित सांभाळू शकतो का हे तेव्हा समजते. लव्ह मॅरेज मध्ये मुला मुलीला त्यांच्या निर्णयाला योग्य ठरवण्यासाठी त्यांच्या नात्याला होईल तितकं सुरक्षित आणि सुंदर करण्यासाठी प्रयत्न करणे महत्वाचे वाटते. लग्नाचे हे दोन्ही प्रकार आपापल्या ठिकाणी योग्यच आहेत. पण तुलनेने लव्ह मॅरेज जास्त सुरक्षित वाटते.कारण आयुष्याचा जोडीदार स्वतः लाच निवडता यावं असे स्वा...

लग्न म्हणजे ....(भाग ४ )

Image
 *लग्न म्हणजे ....(भाग ४ )*    समाजात लग्नाला खूप महत्व आहे पण त्या घटकाला प्रत्येक ठिकाणी योग्य तो न्याय मिळतोय का हेही महत्त्वाचे आहे..जरी पूर्वीपेक्षा लग्नाच्या जोडीदाराला शोधण्याच्या प्रक्रियेत थोडी आधुनिकता दिसत असली तरी ग्रामीण भागांमध्ये *काही मुलं-मुली आजही त्यांच्या जोडिदारापासून फारशा सुखी नाहीत.* याचे अनेक कारणे असू शकतात. ज्या निकषांवर लग्नासाठी मुले शोधली जातात त्यांच्या बाबतीत कधी कधी खोटे सांगून किंवा देखावा करून लग्न लावली जातात. *काही वेळा लग्नाआधी* नवरदेव स्वतः ला खूप नम्र आणि मानसिक दृष्ट्या निरोगी तसेच स्त्रियांचा आदर करणारा भासवतो पण लग्न झाल्यावर काही दिवसांतच त्याचा खरा स्वभाव नवरी आणि तिच्या माहेरच्या मंडळींना दिसू लागतो. असच मुलींच्या बाबतीत सुद्धा होऊ शकते की मुली आधी स्वतः ला दाखवतात वेगळं आणि असतात वेगळं... आपण दुकानात एखादी वस्तू खरेदी करताना किती बारीक चौकशी आणि निरीक्षण करतो पण हल्ली बऱ्याच सोयरिकी हव्या तशा गांभीर्याने झाल्याचे वाटत नाही. चुकीच्या ठिकाणी सोयरिक झाल्याने कितीतरी जीव बरबाद होताना मी पाहिलंय...अनेकदा सर्वकाही नीट असूनही नियती ...

लग्न म्हणजे.....(भाग ३)

Image
 *लग्न म्हणजे.....(भाग ३)*    लग्न झाल्यावर बरेच लोकं मुलगा आणि सून यांच्यावर फॅमिली प्लॅनिंग करण्यासाठी प्रेशर टाकू पाहतात. मला वाटते की हा त्या दोघांचा निर्णय असला पाहिजे. पहिली गोष्ट तर लग्न झाल्यावर निदान दोन तीन वर्षे तरी पती पत्नी ला एकमेकांना अजून चांगल्या रित्या समजून घेण्यासाठी देता आले पाहिजे.जेणेकरून आयुष्याची पुढील वाटचाल करण्यासाठी आवश्यक ते निर्णय ते दोघं मिळून घेऊ शकतील.पण हल्ली ही गोष्ट मुलाचे आई वडील डोक्यात न घेता मरण्याआधी नातू किंवा नात द्या असं करत असतात. हो, काही कुटुंबांतील आईवडील सुशिक्षित आणि खुल्या विचारांचे असतात तिथं ही गोष्ट अपवाद ठरू शकते. *मुलं जन्मास घातलीच पाहिजे* हा विचारच कधी कधी मला विचित्र वाटू लागतो. लग्न यासाठी करतात का? बऱ्याच वेळा मुलगा आर्थिक दृष्ट्या कमजोर असताना देखील फॅमिली वाढवण्याचे निर्णय घेतले जातात. त्याचा परिणाम मी आजूबाजूच्या निरिक्षणातून बघितला आहे. शारीरिक ,आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम असल्यावर हा निर्णय कधीही योग्यच ठरेल. पण लोकांना कोणत्याही परिस्थितीत त्यांचा मोह आवरत नाही अन् वंश पुढे वाढला पाहिजे म्हणून सुनेला...

लग्न म्हणजे ....(भाग २)

Image
 *लग्न म्हणजे......(भाग २)* मी स्वतःला खूप नशीबवान समजतो की लग्नाबाबत घेतलेल्या चुकीच्या निर्णयांचा परिणाम मला लग्न न करताच अनुभवायला मिळत आहे. निरिक्षणातून आपण येणाऱ्या आयुष्याचे संवेदनशील निर्णय घेण्यासाठी स्वतः ला लायक बनवू शकतो.माझ्या माहिती मध्ये असेही काही जोडपे आहेत ज्यांचा संसार लोकांना खूप चांगला चालताना दिसतोय , पण त्यांच्यात विचारांची तफावत आणि घुसमट बघायला मिळते. जसे की बऱ्याच ठिकाणी मुलींना फक्त संसारातच दाबून ठेवलं जातं , त्यांना त्यांच्या करिअर बद्दल विचारही करायचा म्हटला तर नवऱ्याची आणि घरच्यांची परवानगी घ्यावी लागते. पण असेही अनेक घरे आहेत जिथं मुलींना सून म्हणून नव्हे तर लेक म्हणून वागवलं जातं, त्यांच्या स्वप्नांची काळजी घेतली जाते व ती पूर्ण करण्यासाठी त्यांना सपोर्टही केला जातो. असं काही बघितलं की खरच खूप चांगलं वाटतं.😊 लग्नाआधी जी मुलगी स्वतः च्या घरी वाटेल तसे बोलू शकते , वागू शकते, तसे तिला लग्नानंतर करता येत नाही. मुलगा मात्र लग्नाआधी आणि नंतरही हवं तसं वागू शकतो. काही घरांत मुलगा चांगला असतो पण सासू सासरे आगाऊ निघतात. तर काही घरी सासू सासरे चांगले मायाळू ...

लग्न म्हणजे... (भाग १)

Image
 *लग्न म्हणजे.....(भाग १)*    लग्न माझ्यासाठी खूप म्हणजे खूपच मोठी गोष्ट आहे. अजून लगीन झालं नाही तरी मला आजूबाजूच्या जोडप्यांचे संसार बघू बघू खूप अनुभव आले आहेत. ते म्हणतात ना काही गोष्टी करून बघितल्या पेक्षा दुरून बघितल्यावर सुद्धा माणूस शिकत असतो. लग्न म्हणजे फक्त बायको आणि मुलं असणं आणि मोठा संसार असा अर्थ नसतो. तर नवरा बायको ने एकमेकांच्या प्रत्येक गोष्टी आणि सवयीबद्दल जागरूक राहून प्रत्येक चांगल्या वाईट परिस्थितीत एकमेकांना समजून घेऊन सांभाळायचं असतं... मला माझे मित्र , मैत्रिणी आणि नातेवाईक तसेच सहकारी नेहमी विचारतात की *लग्न कधी करतो?* माझं एकच उत्तर असते की मी सध्या स्वतः ला लग्नाच्या लायकीचा समजत नाही. कारण लग्न काही पोरखेळ नाहीय! *फक्त एक चांगल्या मनाचा माणूस* म्हणून मी कोणासाठी योग्य ठरत नाही. सोबतच आर्थिक सुरक्षिततेचा प्रश्नही महत्वाचा असतो, (जो सुटायला अजून काही दिवस बाकी आहेत). माझ्या मते *लग्न ,बायको , पोरं बाळं* ही माणसाची *गरज नसते*. तर आयुष्य अजून सुंदरतेने जगण्यासाठी असलेल्या माध्यमांपैकी एक असते. *लग्न केलं तर मुलं बाळं केलीच पाहिजे* अशीही गरज नसते . ...