Posts

Showing posts from June, 2019

कशी ती...

#ती ....….. कशी ती आली जीवनात माझ्या, रंग भरले तिनं जगण्यात माझ्या, खेळ खेळी केशांशी बेधुंद होऊन , अशी गेली अडकुनी मनात माझ्या... नसेल ती सुंदर इतरांसाठी; पण , हुशारी तिची भावे मनास माझ्या,  गोड तिची वाणी ,खट्याळ तिची भाषा, पाहुनी तिस  झाली बंद माझी ही वाचा.... पण गुणगुणत गाणी तिच्यासाठी रोज , दिवसही जातो  आजकाल गोड माझा , कसली जरी कटी तिनं मजसी न बोलण्याची , तरी मी धडपडत असतो एका झलकेस तिच्या, नको मज तिचं प्रेम ,बस हवंय तेच , जे नसेल कुणासही भेटलेलं अद्याप , जे राहील फक्त जवळ माझ्या...          *(गणेश शेळके)

सांगा बरं...

Image
दिवाळी म्हणजे 'फटाके आणि मोठया आवाजाने वाटणारी गंमत....' असा विचार मुलांमध्ये असतो..खरच सांगा मित्रहो, फटाके फोडून कोणता फायदा होतो बरं...? होणाऱ्या आवाजानं धीट पोरं आनंद घेतात पण तिथच्या आजूबाजूच्या म्हाताऱ्या कोताऱ्या अन चिमुकल्या मंडळींचा विचार करतं कोणी?.... दिवाळी आली रे आली की पोरं एका हप्त्या आधीच फटाके फोडायला सुरू होतात न!...पण या लहान मुलांना फटाक्यापासून होणाऱ्या वाईट परिणामाचं ज्ञान देतं कोणी? ....बरं तुम्हाला फोडायचेच असतील तर कमी आवाजाचे आणि कमी घातक फटाके फोडा की ....ते सुतळी बॉम्ब , तीन आवाजाचे फटाके, ते रॉकेट अन अजून निघतच आहेत नवीन नवीन विस्फोटक आवाजाचे फटाके....!      बरं फक्त दिवाळीचंच असतं तर काही वाटलं नसतं. इथं तर नवीन वर्षांचं स्वागतही  फटाक्यांशिवाय होतंच नाही....आणि जेव्हा लग्नाचा सिजन असतो तेव्हा विचारूच नका बापाहो !...."अमक्याच्या पोरीच्या लग्नात अमुक हजाराचे नुसते फटाके होते ,आता आमच्या पोरीच्या लग्नात टमुक हजाराचे फटाके आणू !"आम्हीच आमच्या पर्यावरणाचा ऱ्हास करायला निघालोय....लहान बाळांच्या कानासाठी ते मोठे आवाज किती घातक असतात मा...

ग्रंथ हेचि गुरू...

Image
एक दिवस सहज बाहेर गेलो होतो.एका ठिकाणी पुस्तकांचं भव्य प्रदर्शन भरलेलं दिसलं.मी आत गेलो अन खूप सारे पुस्तकं चाळून बघितली.तिथल्या पुस्तकांपैकी एक जरी वाचलं तर आयुष्याचे महत्वाचे धडे शिकायला भेटू शकतात. 'द पॉवर ऑफ हॅप्पी थॉट्स' नावाचं पुस्तक मी तीन वर्षांपूर्वी थोडंच वाचू शकलो होतो पण त्याचा माझ्यावर इतका परिणाम झाला की माझे परिस्थितीकडे बघण्याचे विचार अन दृष्टिकोनच बदलून गेलेत..ग्रंथ हेच आपल्याला आपल्या अडचणींवर उपाय शोधण्यात मदत करू शकतात.निर्जीव पेजेस ची ही पुस्तकं ,पूर्ण इतिहास अन जगाला आपल्या समोर सजीव बनून व्यक्त करत असतात.. आज तुम्हाला कोणी मार्गदर्शक जर भेटत नसेल तर रिकामे फिरण्यात वेळ घालवण्यापेक्षा चांगले चांगले ग्रंथ वाचण्यात वेळ घालावा.ज्ञानात भर पडली की अडचणी आपोआप कमी होतात.असे खूप विषय आहेत ज्याबद्दल कुणाला काहीच माहीत नसतं पण हे पुस्तकं तेपण आपल्याला वाचण्यासाठी उपलब्ध करून देतात. लिहिणाऱ्या प्रत्येक माणसानं आतापर्यंत अनेक जग बदलून टाकणारी कितीतरी ग्रंथ, पुस्तकं,कादंबऱ्या असे खूप सारे साहित्य लिहून ठेवले आहेत.खरच किती प्रगल्भ विचारवंत आहेत आपल्या देशात ज्यां...
Image
बालपणापासून सोबत असलेले माझे मित्र मला कधी कधी भेटतात तेंव्हा खूप आनंद होतो ,पण....ज्यावेळी असाच बोलता बोलता माझा तो प्रिय मित्र खिशातुन गुटख्या ची पुडि काढतो किवा तंबाकू काढतो तेंव्हा आपली मैत्री हरल्यासारखंच दुःख होतं......जे मित्र कधीच व्यसन करत नव्हते ते आज भेटतात तर खिशात पुड्या घेऊन...!...माझी हीच मित्रमंडळी महाराजांच्या किंवा ,बाबासाहेबांच्या नावाचा रुबाब मीरवतात त्यावेळी मात्र तळपायाची आग मस्तकात जाते....! जो मित्र कधी काळी आपला सर्वात जवळचा वाटायचा तो या गोष्टीमुळे नको नकोसा वाटू लागतो....काही विचारले तर साले नुसतं परिस्थितीचे कारण पुढं करतात आणि "तुला नाय कळणार.." असं म्हणून गप्प करतात... सालं यापेक्षा आणखी वाईट गोष्ट कुठली असणार एका खऱ्या मित्रासाठी?...काय चुकी आहे त्यांच्या आय बापांचि ?....काय खरंच टेन्शन आल्यावर फक्त व्यसन हाच योग्य मार्ग भेटतो यांना ?...   Gkshelke..

मी असाच आहे आणि असाच राहणार..

Image
मला प्रसिद्धी नको .मला जे पटतं त्याला समर्थन आणि जे नाय पटत त्याचा विरोध करावासा वाटतो म्हणून लिहतो. मग त्यात कधीकधी भाषा बदलत राहते, पण मला फरक पडत नाही . कुणी वाचावं आणि शाबासकी द्यावी यासाठी नाही लिहीत मी.  लिहून पोस्ट केल्यावर माझं मन हलकं होतं आणि मी मोकळ्या मनानं अभ्यास करू शकतो . पण समाजात चालणाऱ्या वाईट गोष्टींचा राग येतो , अन्याय बघवत नाही , म्हणून सालं मनाला वाटतं की अजून दोन चार लोकांना माझ्यासारखा अनुभव आला पाहिजे ,त्यांनाही जाणीव झाली पाहिजे म्हणून लिहितो .माझ्याकडं जास्त शब्दसंपदा नाही कारण मी जास्त वाचत नाही . मी जास्त वाचत नाही म्हणून राजकीय पोस्ट्स करत नाही.लिहिण्यासाठी ज्ञान असावं लागतं.. पण काही गोष्टी निरीक्षणातून तसेच अनुभवातून लिहू शकतो म्हणून लिहितो..मी मनाची भाषा वापरतो .मला संदर्भासहित स्पष्टीकरण करून लिहिण्यात काही रस नाही .अलंकारिक भाषा मी कमीच वापरतो .  कुणी माझी पोस्ट वाचावं आणि मला like comments द्याव्यात अशी अपेक्षा मी बाळगत नाही.(पूर्वी वाटायचं पन आता नाही .)मी post नुसार फोटो टाकत नाही , मी कधी कधी वेगळी भाषा वापरतो जी लोकांना रुचत नाही ,माझ्...

आपल्याला नाय पटत...

Image
‌काही माणसं ना इतके निगेटिव्ह असतात की त्यांना काहीही चांगलं जरी दिसलं तरी त्यात काही न काही दोष शोधतात...एखादा व्यक्ती काही व्यक्त करत असला की त्यांना खटकतं..स्वतः च्या आयुष्यात छान चालू असल्यावर दुसऱ्याच्या आयुष्यात होणाऱ्या गडबडीचं बघतात...सुदैवाने आपल्याला असली नकारात्मक माणसं भेटली नाहीत याचा आनंद आहे...ज्याची अडचण त्यालाच माहीत असते.त्यामुळं काहीही विचार न करता उगाच त्याच्या कामात नाक घालणं योग्य नसतं..आपल्याकडे असली प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात आहे.या प्रवृत्तीमुळेच समाजाची प्रगती खुंटते... कोणाला वाटतं की आपण नेहमी अडचणीतच राहावं?...काही गोष्टी असतात ज्यामुळे त्यांना पुढची वाटचाल थोडीशी अवघड असते..लोकांचं चालतं की लवकर नोकरीला लागा. त्यांना काय माहीत इकडं काय अडचणी आहेत ते...बोलायला काय जाते लोकांना...ज्यांच्याकडून आपल्याला मानसिक आधाराची अपेक्षा असते तेच माणसं  कधी कधी आपल्यावर नकारात्मक टीका करू लागतात...लोकांच्या बोलण्याने प्रभावित होऊन काही माणसं स्वतः च्या च नातेवाइकांना वाईटात काढू लागतात.. हे सगळं त्यांच्या नकारात्मक दृष्टिकोनामुळे घडते...काही माणसं जास्त काही बोलत नाह...

#हास्य...

Image
चेहऱ्यावर हास्य ठेवणारी व्यक्ती जीवनात नेहमी अडचणींवर लवकर मात करते हे मी अनुभवावरून सांगतोय.हास्य म्हणजे सकारात्मकतेला आव्हान देणारी एक शक्ती असते.जेव्हा खूप साऱ्या अडचणी एकाच वेळेस येतात ,तेव्हा लोकं खचून जातात ,नशिबाला दोष देत बसतात. हे नशीब गीशिब काही नसतं, तो सगळा मनाचा खेळ असतो.ज्याला वाटतं की आजचा दिवस खूप खराब जाणार, त्याचा दिवस नक्कीच खराब जातो.आणि जो नेहमी हसत हसत अडचणींचे स्वागत करतो आणि तरी म्हणतो की आजचा दिवस माझ्या लाईफ चा सर्वात डॅशिंग दिवस होता, त्याचे पुढचे सगळे दिवस हे आपोआप चांगले जातात...प्रॉब्लेम हा नाही की आपल्या जीवनात अडचणी येतात, तर प्रॉब्लेम हा आहे की आपण अडचणीशी लढण्याऐवजी सगळा वेळ रडण्या पडण्यात घालतो.उपाय समोरच असतो पण आपण नकारात्मकते मध्ये असे गुंफलेलो असतो, की आपल्याला तो दिसतच नाही...डॉक्टर जेव्हा रुग्णाला तपासतात ,तेव्हा त्यांच्या चेहर्याकडे नक्की बघजा, जास्तीत जास्त डॉक्टर हे चेहऱ्यावर पॉझिटिव्ह स्माईल ठेऊनच पेशंट ची काळजी घेत असतात.गोळ्या औषधं कितीही भारी असोत पण रुग्णामध्ये जर जगण्याची उमीदच जागी नसेल तर तो बरा होणार नाही. याउलट जेव्हा डॉक्टर प्रे...

समजलं तर बघा...

Image
जीवनात सर्वकाही जागीच भेटत नाही.त्यासाठी हातपाय हलवावे लागतात...म्हणजे मेहनत करावी लागते.. थोडंस समजदार झाल्यावर जबाबदारी ची जाणीव मनाला स्वस्थ बसू देत नाही..वेळेचं बंधन माणसाला हवं ते लवकर मिळू देत नाही..सतत मनाला कुटुंबाचं भरणपोषण कसं करायचं या प्रश्नांना सामोरं जावंच लागतं...महत्वाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी थोडं कर्ज घेतलं आणि ते परत करण्यास आपण तात्पुरते असमर्थ ठरलो ,तर आपल्याच मनाची काहिली काहिली होते...काही निर्णय हे प्रॅक्टिकली विचार करूनच घ्यायला हवेत. ते जर मनाने घेतले तर कधी कधी त्यावर पश्चातापही करावा लागतो...संकटं तर कधी कधी पाचवीलाच पुजलेली वाटू लागतात..कठीण परिस्थितीमध्ये कोणी देवासारखा धावून येतं तेव्हा सर्वकाही ठीक होईल अशी उमेद सुरू होते...आशा, अपेक्षा अन महत्वाकांक्षा माणसाला सुखाने जगू देतच नाहीत...सतत नवनवीन मोहमायास सामोरे जावे लागते...उत्पन्न वाढले की गरजांची संख्याही वाढू लागते..कमी पैशात सुखाचे जीवन जगणाऱ्या कुटुंबात उत्पन्न वाढल्यावर बचतीचे प्रयत्न वाढल्यास त्यांचं भवितव्य सुंदर बनते..आयुष्य किती जगता येईल हे कोणीच सांगू शकणार नाही.पण त्याला किती सुंदर बनवता य...

थोडक्यात पैसा आहे तर सुख आहे...

Image
पैसाच आहे सर्वकाही, पैसाच देतो आनंदाची ग्वाही, पैसाच आहे सुखांची रास, पैशांमुळेच फिटते अमर्याद गरजांची आस... खरंच पैसा हा माणसाला त्याची औकात दाखवून देत असतो, पैसा नाही तर तुम्ही कितीही हुशार असले तरी  ती हुशारी धरीच्या धरिच राहते.. अनेक गरजा आणि अमर्याद इच्छा.... उत्पन्नासोबत खर्चातही होते वाढ.. कठीण समय येता  नाही उरत पैसा, दुखू लागते माकडहाड... Gk

कुणास ठाऊक?...

Image
कुणास ठाऊक ?... माणसं येतात माणसं जातात , पण काहीच माणसं मनात राहतात , बाकी सर्व जवळ असूनही दूर राहतात.... अनेक विचार दर मिनिटाला येतात , पण काहीच विचार कृतित  राहतात, बाकी सर्व विचार फक्त विचारच बनून राहतात.... कुणी अनोळखी येऊन कधी मनात घर करून जातात , तर कुणी नेहमी सोबत राहूनही फक्त आपला फायदा घेऊ पाहतात... बंधने तर खूप असतात , पण त्याना पाळणारे खूप कमी राहतात....               - Gkshelke....

जात करते घात...

Image
कुणीतरी खरंच म्हटलंय की  "जात हा अपघात आहे  त्याबद्दल गर्व कधीच करू नका  कारण काळ आणि  वेळ आल्यावर ....जातीचं  नाही तर माणुसकीचं रक्त  कामाला येतं ..........."      मित्रांनो हल्ली खूप भयानक वातावरण सुरू आहे.भीमा कोरेगाव च्या इतिहासाचा आजच्या वर्तमानावर प्रभाव पडला आहे...नेहमी सर्व धर्मियांना रोज वंदन करणारी भारतीय समाज आज चार पाँच कुत्र्याँनि केलेल्या वर्तनामुळे आव न ताव बघता स्वकियांवर बिघडला आहे...महापुरुषाच्या पावन स्मृतीच्या अपमानाचा निषेध करणे योग्यच आहे..पण त्याचा परिणाम कुणाच्या जीव धोक्यात जाण्यात होणे हेही बरं नाही...बाबासाहेबांनी दिलेल्या शिकवणी नुसार समभाव मनात ठेऊन आपण सर्व धर्मियाँनि जातिपेक्शा आपल्या मातीवर प्रेम करायला हवं ,शेवटी सर्व माणूसच आहेत..जात म्हणजे एक समाजाला लागलेला डाग..ज्याचा फायदा काही मोजक्या सत्ताधिशांना होत आहे...      कधी बघितले का आपल्या कडे , की आपण रोजच्या जीवनात कुण्या परधर्मीय बांधवाला वाईट बघितलं किंवा त्याने आपणास हिनवून वाईट वागणूक दिली ?..हा तो भाग वेगळा की सगळेच एकमेकांच्...

अवघड आहेत वाटा...

Image
अवघड आहेत वाटा अवघड आहेत मार्ग, प्रयत्नांची करून पराकाष्ठा घडवुयात एक स्वर्ग; वाईट मार्ग पकडू नका ईमानास या झटकून, बेजोड़ अशा सु-तत्वांना रहात चला चिटकुन.. खास असावी आशा जीवाला तमा असो  उद्याची, कास धरावी सुधारण्याची   परिस्थिती ही सध्याची.. कधी न जावे दुखवुनी कुणाहि यशाच्या ह्या वाटेवर, मनांत जागा बनवत जावी तुडवत रस्ते  खडतर... संघर्षांमधुनी  घेत जावी  योग्य अशी एक शिकवण ; चला निघूया करण्या आपुल्या मायभूमीची राखण....       {कवि : GK....SHELKE }

दारूचा भक्त...

Image
जवळ नाही पैसा म्हणून तो पिसाळून गेला, उधार दारू घेऊन कर्जाचा डोंगर उभा केला, आम्ही समजावून गेलो थकून त्याला, पण त्याने डोंगराचा अजून पर्वत केला... आईला देई ताण ,बायकोला देई शिव्या, लोकांचा खाई मार अन सकाळी म्हणे मैने काय किया? लहान चिमुकल्या लेकरांची न येई त्याला  माया लाडामुळेच हा मायबापाच्या ,माणूस गेला वाया... कितीदा पडला खड्यात, कितीदा पडला नाल्यात, पण बेशर्मासारख तरीसुद्धा हसे गालातल्या गालात... व्यसनामुळं सगळं  त्याचं आयुष्य झालं बरबाद, अन ज्यादा ढोसून एका रात्री ,झाला तो आजाद...            गणेश शेळके.

#कडू_बोलतो_पण_खरं_बोलतो...

Image
... खूप विचार विमर्श केल्यानंतर आणि सत्यपरिस्थिती लक्षात घेतल्यानंतर विचार करावा की  सख्खी आई जर चुकीचे वागत असली आणि बायको ची  चुकी नाही हे समजलं तर तुम्ही काय कराल ?....मी असे अनेक  जिवंत उदाहरण बघून पोस्ट करतोय......माझ्या लाईफ मध्ये मी आजपर्यंत कधीच चुकीच्या माणसाला सपोर्ट केला नाही आणि त्याचा लाडही केला नाही. मग तो आपला सक्का बाप किंवा कोणताही नातेवाईक असो त्याने केलेली चुकी जर मोठी असेल तर मी अजिबात आदर करू शकत नाही. मग भलेही माझ्यावर कुणी कितीही उपकार केलेले असोत....आपल्या मुलींना आपण इतक्या लाडणं वागवतो पण परक्या घरून आलेल्या सुनेला अशी वागणूक द्यायची ? कशाचाही ताण तिच्यावरच काढायचा? वा रे वा घनचक्कर साले!!...जर भविष्यात माझी आई अशी वागली   आजचं हे बोलणं माझ्या कृतीत उतरवायला मला अजिबात वेळ लागणार नाही... सासू आणि सुनेच्या वादात पडू नाही असं म्हणतात ते बरोबर आहे..पण जर त्या दोघींच्या भांडणाचा वाईट परिणाम त्याच्यावर ,त्याच्या मुलांवर होत असेल तर काय त्याने चुपच राहायला पाहिजे?आणि समजा त्यांना सावरण्यासाठी वेळ देऊनही त्या सुधारत नसल्या तरी काय आपण त...

15 .01.2018

Image
तू चिंता नकोस ग करु आई मी घेईन काळजी रोज माझी. आता मी मोठा झालोय न.पण तरी तुझ्यासाठी मी आजही छोटा बच्चाच आहे.31 डिसेंबर च्या दिवशी मला call करून" काळजी घे आज " असं तू बोलली..आई तुला माहीत आहे तुझं हे लेकरू इतके समजदार झालय की योग्य अयोग्य बरोबर ओळखू शकतं...त्यामुळं तू अजिबात चिंता करू नकोस...तू दिलेले सर्दी खौकल्याच औषध आणि मधाची बाटली मी रोज थोडी थोडी घेतो ह...रोज फोन वर तू विचारत असतेस की माझी तब्बेत कशी आहे ते..पण.......आई कधी तू स्वतःची तब्बेत कशी आहे ते खरं खरं सांगत नाहीस..तू मला कमज़ोर पडू देऊ इच्छित नाहीस हेही मला माहीत आहे...पण तू अजिबात काळजी करू नकोस आई !तुझा हा बछड़ा आता शेर झाला आहे.त्याच्यात परिस्थितीनुसार खूप परिवर्तन आले आहे.म्हणून कोणतीही परिस्थिती हाताळण मला जमाय्ला लागल आहे..        आई तू सौसलेल्या काबाडकष्टाची छबी आजही माझ्या मनात आहे आणि मला त्याची जाणीवही आहे...मी कधीच तुझ्या नावाला खराब होऊ देणार नाही...आई ,आपली परिस्थिती चांगली नसतानाही तू माझ्यामागे खंबीरपणे उभे राहून तू मला शिक्षण घ्यायला पाठिंबा देताहेस....माझ्या कामाच्या पैशातूनही तू...

प्रवास आयुष्याचा...

Image
प्रवास हा आयुष्याचा  कधी सुखाचा, कधी दुःखाचा खडतर श्रमाचा, मोहणाऱ्या भ्रमाचा... गोंधळाची ओंजळ, अनुभवांची अंघोळ, रुजलेला स्वभाव,पडणारा प्रभाव... पैशांची कमतरता, टंचाईचा गोता... आयुष्य एक खेळ मनाचा, एकटेपणाची जाणीव, समाधानाची उणीव... प्रतिष्ठेचा देखावा, आश्वासनांचा कांगावा.. आयुष्य अनमोल ,अद्वितीय, अद्भुत अन अनिवार्य...       GK SHELKE

साऱ्याच मनांना हक्क आहे...

Image
साऱ्याच मनांना जन्मसिद्ध  हक्क आहे हसण्याचा. आयुष्यातला आनंद  मनापासून भोगण्याचा.. कितीही जन्म गेले  तरी भाग्य लागते  माणसाचा जन्म भेटण्याचा ! हक्क आहे ,हक्क आहे सर्वांना आपला विषय मांडण्याचा, प्रत्येक शब्दाला हक्क आहे  कृतीमध्ये उतरण्याचा ! भलं असो ,बुरं असो  वा गोंधळ असो मनातला, यांच्याचसाठी कुढत असतो जीव हा माणसाचा ! निराशा कशा या येई वाटेत, कितीही असो रस्त्यात काटे, अर्थ त्यातूनच कळतो  दुर्मिळ या जगण्याचा ! सुख असो वा असो हे दुःख ते पचवण्या लागतो साऱ्याना  निर्धार असा तो  मनाचा ! नको तो गर्व , नको तो हेवा  नको ती भ्रांती अहंपणाची नसावा कुणातही मीपणा अन अंश मात्रही स्वार्थाचा !.....               कवी  -: गणेश शेळके

सकारात्मक कविता...

Image
अडचणी खूप आहेत म्हणून का उदास बसायचं? उपाय सापडत नाही म्हणून का कुढत मरायचं? ताण वाढत आहे म्हणून का दुःखी राहायचं? अमुक जमत नाही म्हणून का कमजोर पडायचं? संकटाना घाबरतो म्हणून का दूर पळायचं? इतका सारा आनंद सोडून रडत का फिरायचं  ?... कोण म्हणतं नाही हो काही कारण हसण्यासाठी? काम ,मित्र ,कुटुंब जिवलग सगळ्यांमध्ये च आनंदाला शोधायचं... निराश होऊन किती रे दिवस नशिबाला कोसायचं ?... स्वतः च्या चुकीचं खापर देवावर का फोडायचं?…… नाही होणार अडचणी कमी ,तरी हसत जगायचं, नकारात्मकतेला संपवेल ते हसणं,म्हणून खुश राहायचं..…!                GKSHELKE  (१५/०६/२०१८)

खेड्यातली छकुली...(विनोदी कविता)

#खेड्यातली_छकुली_कलेजिला_गेली...! (कृपया कुणाला लागू होत असेल तर मनाला लावून घेऊ नये .) खेड्यातली छकुली कलेजिला गेली, अन भेटीले गेली माय ओयखु नाय आली माय ओयखु नाय आली...! मोट्या मोट्या शरांची मोटी मोटी थाठं, अन कार्टी आता लागली झोपू वाजेपर्यंत आठं...! अन खेड्यातल्या श्येडुल ची तिनं तं कत्तल च केली , अन भेटीले गेली माय ओयखु नाय आली माय ओयखु नाय आली...! हुशार व्हती पोट्टी माही माय बाई खूपं, लावून खायची पोळीले लोणी अन तूपं, पण शरात जाऊन तिनं तं डायटिंग सुरू केली , अन भेटीले गेली माय ओयखु नाय आली माय ओयखु नाय आली...! खेड्यात व्हती माय, तवा चांगली व्हती बाडी , पर डायटिंगमुळं झाली साऱ्या अंगाचीच काडी माय अंगाचीच काडी ... अन लम्या-लम्या केसांची तिनं त कटिंगच केली , अन भेटीले गेली माय ओयखु नाय आली माय ओयखु नाय आली...! खेड्यामधी माही शकू शांतच राहत होती , अन तिथं जाऊन पाह्यलं तं गप्या मारत व्हती माय गप्या मारत व्हती ..! अन मोकया चाकया कपल्याची तिनं त फिटिंगच केली , अन भेटीले गेली माय ओयखु नाय आली माय ओयखु नाय आली...! इग्नोर केली तिनं माय स्टडी आणि रायटिंग , अन आवडू ल...

कलियुगाचं गीत...

सांगतो खरं ऐका बरं, कलियुगाचं उलटलं वारं... आई म्हणती बाली,  बाली शाळेला गेली, अन कोणत्या तरी पोटयासोबत  सिनेमा पाहून आली ! गोविंदाचा फोटो  तिनं हातात आणला, अन घरी येऊन आरशात पाहून  तोंडाले लावला ! व्हाट्सआप फेसबुक ट्विटर चा  ह्यो भलताच जमाना, अन प्रत्येक गल्लीत  सापडतोया बेरोजगार दिवाना ! हल्लीच्या या जनरेशनला  'याड' हे लागलं, अन सैराट मधून पोरांनी मग  भलतंच काही घेतलं !... दारू तंबाकू एसणापाई  बरबाद झाली घरं, अन गावच्या टपरिवरती  दिसू लागली पोरं..! दगडधोंड्यांना पुजून पुजून  करतात दान- धर्म, अन मानवतेला धोका देऊन  करतात वाईट कर्म !... माय-बापं घाम गाळून  पोरांले शिकवतात, अन पोरं मात्र मान त्यांना  खाली घालायला लावतात !.... वाईट लोकांना हे लोकं  लवकर जवळ करतात, अन चांगल्याना मात्र  येड्यामध्ये काढतात !..… इमोशनल होऊन भावनात वाहून  निर्णय हे चुकतात, अन येळ निघून गेल्यावर  मग रडत ते बसतात !... सांगत...

अस्तित्व माझे...

Image
अस्तित्व माझे.... काय आहे अस्तित्व माझे ?... प्रश्न हा मला रोज पडतोय, हीरा आहे की कोळसा लपलेला माझ्यात मी शोधतोय... हरवलोय मी कुठंतरी एका कोपऱ्यात शहराच्या, मुंगी पेक्षाही लहान आपण तुलनेत जगाच्या, स्वतःमध्येच कुठतरि एक विचित्रपणा बघतोय... काय आहे मी ,कसा आहे मी ? याचेच कोडे पडे मला नेहमी...! हलकेच मिटवुनि डोळे , मी माझ्यातला खरा "मी "शोधतोय...       :@Gkshelke...

मैत्री सुखा समाधानाची आणि अभिमानाची...!

Image
‌11 वी 12 वी चं वर्ष होतं. शहरातल्या सुप्रसिद्ध कॉलेज मध्ये ही कॉमर्स ला आणि तो आर्ट्स ला होता..दोघेही आपापल्या अभ्यासाशी प्रामाणिक होते आणि चांगले हुशार होते.कॉलेजमध्ये रेग्युलर लेक्चर्स व्हायचे त्यामुळं आपल्याला रोज शिकायला भेटते या विचाराने दोघेही खुश होते.त्याला इंग्लिश खूप आवडायचं आणि तिला अर्थशास्त्र.आर्टस् आणि कॉमर्स यांचा अर्थशास्त्र हा विषय कॉमन होता.त्यामुळे रोज त्यांचा एकत्रित एका वर्गातच पिरेड व्हायचा.सर मुलांना प्रश्न विचारायचे आणि ज्यांना येते त्यांना हात वर करायला सांगायचे.मग काय, ह्या दोघांचाही हात नेहमी उत्तरासाठी वर असायचा.सरांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दोघंही आत्मविश्वासानं द्यायचे.त्यामुळे ते दोघेही सरांचे फेव्हरेट विद्यार्थी म्हणून ओळखले जायचे.याच गोष्टीतून दोघांची एकमेकांशी चांगली ओळख झाली होती.पण ते कधी एकमेकांशी समोरून बोलत नव्हते.बस पिरेड चालू झाल्यावर एकमेकांकडे बघून आदराने स्मितहास्य करायचे.ह्याला अर्थशास्त्र थोडा किचकट वाटायचं आणि तिला इंग्रजी... ‌ ‌     एक दिवस झालं असं की ती तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आर्ट्सच्या क्लास मध्ये आली.त्य...

अपंग...

Image
मंदिराच्या पायथ्याशी बसलेल्या अपंग , निसाहाय गरिब म्हातारीला क्रॉस करूँन आम्ही दानपेट्यात पैसे टाकतो,   म्हणूनच आमचा देव आम्हाला सर्वकाही देतो... माझ्या मनात एकच गोंधळ ,  कशी काय भरेल देव स्वार्थी माणसाची ओंजळ ? ... मंदिरात जाऊन फोडतो आम्ही नारळ ,  कशी काय वाटत नाही गरीबांची तळमळ ? ... पुन्हा विचारतो एक प्रश्न देवा तुला... तरसू राहिले गरीब दोन घासासाठि ,  अन इकडं मात्र आम्ही भजत असतो पोथी ... कसे काय रे देवा तुझे हे मुलं इतके स्वार्थी, दिवस होता अज्ञानात त्यांच्या होतच आहे  भरती... मुर्त्या महाग देवा तुझ्या घडवून केला जातोय बाजार, अन गरिबांच्या शेतमालाला झालाय जणू आजार..  कशी रे देवा भक्ती यांची समजत नाही मला, गँगस्टर सुद्धा पापं करून पूजत असतात तुला... त्या म्हाताऱ्याबरोबर लोकांची मानसीकता पण झाली का रे अपंग ? ........   Gkshelke..

हेही महत्वाचं...

Image
एक दिवस मीपण म्हातारा होईन...मग आयुष्याच्या अशाच एका वळणावर मला सेवानिवृत्त व्हावे लागेल आणि मी असाच ह्या आजोबांसारखा गावच्या पारावर इतर वृद्धांना कंपनी देईन...मग त्यावेळी मला कसं वाटेल ?...माझ्या मनात कोणती विचार घोळत  राहतील..?...      असा विचार आज माझ्या मनात आला...आपण रोज कुठं न कुठं टाइमपास करतो ,कुठं न कुठं हिंडतो.कुठं तरी  एखाद्या चावडिवर किंवा गावच्या पारावर अनेक वयोवृद्ध आजी आजोबांची गर्दी दिसते...पण आपण तिथं जाऊन बघतो का ?....  मी मात्र तसं वागायला सुरुवात केलीय...त्यांच्या मनात खूप सारे विचार असतात. खूप सारे कोडे असतात जे ती सोडवत बसलेले असतात...कधी एखादे आजोबा एकट्यात एका दुसऱ्या कोपऱ्यात दूर बसलेले दिसतात तेव्हा त्यांच्याशी बोलून बघा...         आपल्याला खूप सारे मित्र असतात वेळ घालवण्यासाठी पण या म्हातारयाना कधी कधी कोणीच भेटत नाही...ते एकटेच बसलेले असतात...त्याना बघून कसतरी feel होतं...आपणही एक दिवस म्हातारे होणार ,तेव्हा असंच कधीतरी आपणही  पारावर किंवा चावडिवर बसु....म्हणून कुणी असे बसेल दिसल्यावर आपल्याजवळ...

मोबाईल...

चार तारखेलाच मी अँड्रॉइड 4g फोन घेतला. तशी मला  त्याची खूप गरज होती. आधीचा फोन 3g होता त्यामुळे हा बदलण्यासाठी माझा प्रयत्न चालू होता. फोन जवळ येण्याआधी मला वाटायचं अमुक अमुक करू तमुक तमुक करू परंतु नंतर मात्र फोन घेतल्यानंतर काहीच सुचेनासे झाले. कारण या अँड्रॉइड फोर जी फोन मध्ये काय कराव आणि काय नाही हे सहज समजणे खूप कठीण आहे. प्रथमतः फोरजी नेटवर्क चा आनंद घेत होतो मात्र त्या आनंदाच्या भरात आपला बहुमोल वेळ वाया जाऊ नये याची सुद्धा काळजी घ्यावी लागेल अशी जाणीव निर्माण होत आहे. कारण ज्या कामासाठी फोन घेतला ते काम मागे पडत आहे आणि विनाकारण च्या मनोरंजना मध्ये जीव गुंतत आहे. दोन-तीन दिवसापासून याच विचारांमुळे गंभीर  होतो नंतर मात्र वाटू लागलं की थोडं नियंत्रण आवश्यक आहे. बहुधा जवळपास 80 टक्के लोकांकडे तरी आज फोरजी फोन आला असेल आणि ज्यांच्याकडे नसेल त्यांची तो फोन घेण्याची उत्कट इच्छा असेल. परंतु हल्ली  ज्यांना गरज नसते त्यांच्याकडेच जास्तीत जास्त फोन्स उपलब्ध असल्याचे दिसून येते. येऊन जाऊन लहान लहान पोरं पोरी टिक टोक नावाचे ॲप्स वर एन्जॉय करताना दिसत मग बाकीचा वेळ ते व्हाट्...

बेडूक...

Image
डबक्याच्या बाहेर पडलं तेव्हा बेडूक समुद्रात उतरलं, त्याच्या अडचणी च्या कक्षा रुंदावत गेल्या, तिथं त्याला भरपूर संधी भेटल्या , अन्नाचा प्रश्न तर कसाबसा मिटला, पण अस्तित्वाचा मोठा प्रश्न उठला, चहुकडं धोके आणि धोक्याच्या सूचना त्यानं बघितल्या, हुशार बेडकानं त्या खूपच मनावर घेतल्या, बाकीचे त्याचे मित्र घाबरून परत डबक्यात गेले, धडपडीच्या या दुनियेस ते लवकर भिले, पण हा मात्र आपलं काम करत राहिला, कारण यानं कामात आनंद पाहिला, बाहेर च्या जगाशी त्याचा संवाद आला, तेव्हा हा बेडूक त्यांच्यामधलाच एक झाला... गणेश शेळके (१७/०६/२०१८)

चुकी माझीच होती ......

Image
पाणचट गोष्टीला महत्व दिलं, रिकाम्या भावनांना जवळ केलं, मनात फक्त तिलाच घेतलं, जे करायचं नव्हतं तेच मी केलं..... चुकी माझीच की मी तिच्यात गुंतून  गेलो, तिच्याच विचारात हरपून गेलो, नको म्हटलं तरी तिच्यावर प्रेम केलं, भलतंच बेंनं पदरात पडलं उशिराच समजलं घोडचूक झाली , चुकीच्या मुलीची निवड केली, बघता बघता  एक अक्ख  वर्ष गेलं , पण माझं मन तिला अजून  नाय कळलं... प्रेम नव्हतं पाहिजे मला  बस खास मैत्री हवी होती, ती समजून घेईल मला  अशी पक्की खात्री होती... पण माझ्या खात्रीला   तिनं कात्री लावली, प्रपोजरुपी नवसाला ती नाय पावली...          गणेश शेळके

आज कळलं...

Image
तरुण म्हणजे काय असतं ते आज कळलं , कसे भटकतात तरुण कशाकशाने ते आज कळलं... आजूबाजूचं वातावरण पाहून डोकं ठिकाण्यावर आलं, आजच्या तरुणाईला कीड लागलेलं पाहून मन गहिवरून गेलं... आजचं प्रेम नसतं नुसतं प्रेम, ते तर निव्वळ शरीराचं आकर्षण असतं, इथे विचारांपेक्षा चेहरा सुंदर असणं यालाच जास्त प्राधान्य असतं... (अपवाद असतात म्हणा काही ,तुमच्या आमच्यासारखे) आज कळलं की व्यसनामुळे घरची घरं बरबाद होतात, आपण मात्र होणार नाही यातले हे आत्ता पक्क ठरलं... अन तरुण म्हणजे काय असतं ते आज कळलं... भटकत राहिलो अनेक वर्षे क्षणभंगुर गोष्टींपायी, अभ्यासातून तरुणाईच्या,ते सर्व निरर्थक ठरलं... तरुण म्हणजे कसा असावा ते आज कळलं...        कवी :गणेश शेळके                

जाणीव आहे...

Image
(M.com ला असतांना  हॉटेल वर कामाला होतो त्यावेळेस ची पोस्ट) "तू एवढा शिकलेला असून हॉटेल मध्ये का बरं भांडी घासतो रे ?.... "असं खूप जण मला विचारतात.मी सगळ्यांनाच उत्तर नाही देऊ शकत पण आज व्यक्त करतो ....        माझ्या आईनं हाडाचं पाणी करून आम्हा भावंडांना लहानाचं मोठं केलं .लोकांच्या शेतात अगदी काडी कचऱ्यापासून मोठे दगडं उचलण्यापर्यंत चे सर्व कामं ती अव्याहतपणे करते - कुणासाठी ?...फक्त आमच्यासाठी !...आमच्या शिक्षणासाठी .. आमची कोणतीही गरज असो ती पूर्ण करण्यासाठी ती राब राब राबून उसने पासने करून पैसे आणते..आमच्या आजारपणात आमच्यापेक्षा तिलाच जास्त तकलीफ होते...आम्ही मात्र तेव्हा खुशीत तिने आणलेल्या पैशाने गरज भागावायचो...आईनं जर माझ्यासाठी हीन समजली जाणारी खूप सारी कामं कोणतीही लाज न बाळगता केली तर तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी भांडी नाही घासू शकत?...मी का बरं लाज बाळगायची ?...... कामाला असतांना काही पोरं ओळखीची माणसं दिसल्यावर तिथून पळ काढतात...मी मात्र बिंदास कामं करतो .कारण माझ्यातली कामाची लाज आणि आळस कधीच मेलेला आहे...उलट आपल्याला स्वतः चा अभिमान वाटला ...

टीकेला टिका...

टीका करणारे खूप आणि टीकेला टिकणारे कमी असे झाले आहे.. जो टीकेला टिकला समजायचं तो जिंकला!...कसंय की आयुष्यात काही लोक शिव्याशाप देतात ,तर काही लोकं प्रोत्साहन, प्रशंसा करतात.खरंतर दोन्ही प्रकारचे लोकं आपल्या आयुष्यात समान भूमिका पार पाडत असतात .खऱ्या अर्थाने ते आपल्याला धडा, बोध देत असतात.पण आपलं मन म्हणतं,"शिव्या देणारे लोक आपल्या आयुष्यात येऊच नयेत ." खरंतर या जगात बोध घेण्यासाठी सर्व तऱ्हेचे लोकं आणि घटना महत्वपूर्ण आहेत.कोणी आपल्याला ताणें मारतो म्हणूनच तर आपण आपल्या प्रगतीची गती अजून वाढवतो. हा सगळा मानसिक खेळ आहे ,जो ज्याला समजला तो टीकेला बळी पडत नाही.आपल्याला जेपण बरवाईट ऐकायला भेटतं ,ते खरंतर आपल्या भल्यासाठीच नियतीनं केलेलं असतं...कुणाचं आपल्या आयुष्यात येणं आणि अगदी जिवाभावाच्या सोबतीचं आपल्याला सोडून दूर जाणं यात आपलं शुभच चितलेलं असतं.कुणाला जर परीक्षेत अपयश आलं तर तेही त्याला काहीतरी हेतूनं नियती देत असते...ज्याला खूप कष्ट करूनही काहीच भेटत नाही ,त्यामागही काहीतरी विशेष संदेश दडलेला असतो..थोडक्यात जे घडतं ते चांगल्यासाठीच असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही...खास तरु...

लबाड हे मन....

लबाड हे मन कुठच्या कुठं फिरतं, कधी मोकळं हसतं तर कधी दुःखानं झुरतं, मेंदू सांगतो एक अन हे भलतंच काही करतं, लबाड हे मन कुठच्या कुठं फिरतं... मन म्हणतं ऐक माझं मीच खरं सांगतो, पण मेंदू मग मधामधात चमचा फिरवतो क्षणात इकडं क्षणात तिकडं असं हे पळतं, लबाड हे मन कुठच्या कुठं फिरतं... चंचल हे मन उड्या मारत राहतं, नको त्या गोष्टीच्या खोलात डोकावू पाहतं, विचित्र आहे एक गोष्ट जी आहे अस्पष्ट, मेंदू जर आहे डोक्यात, तर मन नेमकं कुठं असतं...?      गणेश शेळके